Poder de Deus
O poder de Deus é incomparável e infinito. Ele criou o universo pela palavra, sustenta todas as coisas e manifesta sua onipotência em cada geração.
A onipotência do Criador
Deus fez os céus e a terra pelo seu grande poder. Nada é impossível para Ele, e sua força está além de toda compreensão humana.
ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याने जग निर्माण केले आपल्या समंजसपणाच्या आधारे आकाश पांघरले.
येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, "मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत."
पाहा, या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे,
किती हळूवार आम्ही त्याचे ऐकतो!
परंतू त्याच्या बलाची गर्जना कोण समजू शकेल?"
देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाचे मन कठीण करून कोण निभावेल?
Poder sobre tudo
O Senhor reina sobre as nações, sustenta os oprimidos e manifesta seu poder tanto no julgamento quanto na redenção.
तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ राज्य करतो;
तो आपल्या डोळ्यांनी सर्व राष्ट्रांचे निरीक्षण करतो;
बंडखोरांनी आपल्यास उंच करू नये.
कैद्यांचे कण्हणे तुझ्या कानी येऊ दे;
ज्या मुलांना मारण्यासाठी नेमले आहे त्यांना आपल्या महान सामर्थ्याने जिवंत ठेव.
देव एकदा बोलला आहे,
मी दोनदा ऐकले आहे,
सामर्थ्य देवाचे आहे.
ज्याने सामर्थ्यी हाताने आणि बाहू उभारून त्यांना बाहेर आणले,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Poder para o seu povo
Deus fortalece os fracos e ressuscita os mortos. Seu poder opera em nós para que experimentemos vitória e transformação.
आणि देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालासुद्धा उठवील.
कारण जरी अशक्तपणात तो वधस्तंभावर खिळला गेला तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे कारण त्याच्यात आम्हीही दुर्बळ आहोत पण आम्ही देवाच्या सामर्थ्याने तुमच्यासाठी जिवंत राहू.
खरेपणाच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने, उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्त्वाची शस्त्रे बाळगून,
ख्रिस्ती मनुष्याची शस्त्रसामग्री
शेवटी, प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा.
सर्वकाळ परमेश्वरावर विश्वास ठेव, कारण प्रभू परमेश्वर, याच्या ठायी सर्वकाळचा खडक आहे.
मी प्रकाश बनविला आणि अंधाराला अस्तित्वात आणले;
मी शांती आणतो आणि अनर्थ उत्पन्न करतो; मी परमेश्वर आहे, जो ह्यासर्व गोष्टी करतो.
परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील,
तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल.
तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील.
परंतु जर मी देवाच्या साहाय्याने भूते काढतो, तर मग यावरुन हे स्पष्टच आहे की, देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे.