Profecia
A profecia é a voz de Deus revelada ao seu povo. Através dos profetas, Deus comunicou seus planos, advertiu contra o pecado e anunciou a vinda do Messias.
Profecia e revelação divina
A profecia na Bíblia não é invenção humana, mas homens santos de Deus falaram movidos pelo Espírito Santo, revelando os mistérios divinos.
कारण कोणत्याही काळात मनुष्यांच्या इच्छेने संदेश झाला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश दिला आहे.
खरोखर आपला बेत त्याच्या सेवकांना
म्हणजेच संदेष्ट्यांना प्रगट केल्यावचून,
प्रभू परमेश्वर काहीच करणार नाही.
जेव्हा त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला. आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले.
Profecias messiânicas cumpridas
As profecias do Antigo Testamento sobre o Messias se cumpriram em Jesus. Seu nascimento, ministério e sacrifício foram anunciados séculos antes.
म्हणून प्रभू स्वतः तुम्हास एक चिन्ह देईल, पहा, एक तरुण स्त्री गर्भवती होऊन मुलाला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देईल.
प्रभूने संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते परिपूर्ण व्हावे यासाठी हे सर्व झाले, ते असे,
"पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल,
आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील." या नावाचा अर्थ, "आम्हाबरोबर देव."
सीयोनेचा भावी राजा
हे सियोनकन्ये, आनंदोत्सव कर! यरूशलेम कन्यांनो, आनंदाने जल्लोश करा!
पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे नीतिमत्त्वाने येत आहे;
आणि तो तारण घेवून येत आहे.
तो विनम्र आहे आणि एका गाढवीवर, गाढवीच्या शिंगरावर तो स्वार झाला आहे.
ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे नीतीमत्वाची प्राप्ती
पण नियमशास्त्राकडून व संदेष्ट्यांकडून साक्ष दिली गेल्याप्रमाणे, नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्त्व, आता, प्रकट झाले आहे. पण हे देवाचे नीतिमत्त्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, विश्वास ठेवणार्या सर्वांसाठी आहे कारण तेथे कसलाही फरक नाही.
Discernimento profético
A Bíblia nos alerta para examinar tudo e reter o que é bom. Nem todo que profetiza fala da parte de Deus — devemos provar os espíritos.
ईश्वरप्रेरणेची कसोटी
प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.
माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षां जो तुमच्यामध्ये आहे; तो महान देव आहे.
सर्व गोष्टींची पारख करा. जे चांगले आहे ते मजबूत धरा. वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा.
खरे व खोटे शिक्षक
खोट्या संदेष्ट्यांविषयी सावध असा. ते मेंढरांच्या वेषात घेऊन तुमच्याकडे येतात. पण खरे सांगायचे तर ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत.
सुवर्णनियम
यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्यात असे तुम्हास वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा, कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टयांच्या शिकवणीचे सार हेच आहे.
आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले आणि मला डोंगर हलवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काही नाही.
यामुळे तुम्ही आता परके आणि विदेशी नाही. तर त्याऐवजी तुम्ही पवित्रजनांच्या बरोबरचे सहनागरीक आणि देवाचे कुटुंबीय आहात तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिक्षणाच्या पायावर बांधलेली इमारत आहात आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे.
"पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिज्कीया याच्याशी बोल." त्यास म्हणावे, "तुझा पूर्वज दावीद याचा परमेश्वर देव म्हणतो: तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत. तेव्हा मी तुला बरे करतो, तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील.