Profecia
A profecia é a voz de Deus revelada ao seu povo. Através dos profetas, Deus comunicou seus planos, advertiu contra o pecado e anunciou a vinda do Messias.
Profecia e revelação divina
A profecia na Bíblia não é invenção humana, mas homens santos de Deus falaram movidos pelo Espírito Santo, revelando os mistérios divinos.
कारण भविष्यकथन मनुष्यांच्या इच्छेने कधी झालेले नाही, तर संदेष्ट्यांनी, जरी ते मनुष्य होते तरी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन परमेश्वराकडून आलेला संदेश सांगितला आहे.
सार्वभौम याहवेह
आपल्या सेवक संदेष्ट्यांना त्याच्या योजना प्रकट केल्याशिवाय
निश्चितच काहीही करणार नाही.
हे ऐकल्यानंतर, त्यांचा प्रभू येशूंच्या नावात बाप्तिस्मा करण्यात आला. मग पौलाने आपले हात त्यांच्यावर ठेवले, त्यावेळी पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते अन्य भाषेत बोलू लागले आणि भविष्यवाणी करू लागले.
Profecias messiânicas cumpridas
As profecias do Antigo Testamento sobre o Messias se cumpriram em Jesus. Seu nascimento, ministério e sacrifício foram anunciados séculos antes.
म्हणून प्रभू स्वतः तुम्हाला एक चिन्ह देतील: कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.
प्रभूने आपल्या संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व घडून आले. "कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील" (इम्मानुएलचा अर्थ "परमेश्वर आम्हाबरोबर").
सीयोनकन्ये, फार आनंद कर!
यरुशलेमकन्ये, गर्जना कर!
पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे,
तो नीतिमान व विजयी आहे,
तरी तो लीन आहे व गाढवीवर बसून तो येत आहे
होय, एका गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे!
पण आता नियमशास्त्राव्यतिरीक्त परमेश्वराचे नीतिमत्त्व प्रकट झाले आहे, याविषयीची साक्ष नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांनी दिली आहे. परमेश्वराचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्यांना दिले आहे, त्यात यहूदी व गैरयहूदी असा भेद केलेला नाही,
Discernimento profético
A Bíblia nos alerta para examinar tudo e reter o que é bom. Nem todo que profetiza fala da parte de Deus — devemos provar os espíritos.
प्रिय मित्रांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, परंतु ते आत्मे परमेश्वराकडून आलेले आहेत का याची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगामध्ये निघालेले आहेत.
प्रिय लेकरांनो, तुम्ही परमेश्वराचे आहात आणि जे ख्रिस्ताचे विरोधक आहेत, त्यांच्याशी झगडून तुम्ही विजय मिळविला आहे, कारण जगात जो आहे, त्याच्यापेक्षा जे तुम्हामध्ये आहेत, ते श्रेष्ठ आहेत.
परंतु त्या सर्वांची परीक्षा करा; जे चांगले आहे ते धरून ठेवा, सर्वप्रकारच्या वाईटाचा निषेध करा.
"खोट्या संदेष्ट्यांच्या विषयी अतिशय सावधगिरी बाळगा. ते मेंढरांची वस्त्रे धारण करून तुमच्याकडे येतात पण आतून क्रूर लांडगे असतात.
तर मग जे सर्व इतरांनी तुमच्यासाठी करावे असे तुम्हाला वाटते, तसेच तुम्हीही त्यांच्यासाठी करा. नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे सार हेच आहे.
मला परमेश्वराचे संकल्पनिवेदन करण्याचे दान असले, सर्वप्रकारच्या रहस्यांचे गहन अर्थ आकलन होत असले आणि सर्व ज्ञान असले आणि जरी डोंगर हालविण्याइतका मजजवळ विश्वास असला, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.
या कारणाने तुम्ही आता परदेशी आणि परके नाही, तर परमेश्वराच्या लोकांबरोबर सहनागरिक आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य झाला आहात. तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या भक्कम पायावर बांधलेले आहात, ज्याची मुख्य कोनशिला ख्रिस्त येशू आहेत.
"परत जा आणि माझ्या लोकांचा अधिपती हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; आजपासून तिसर्या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जाशील. मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन.