Redentor
Deus é o nosso Redentor. Ele nos resgatou da escravidão do pecado, nos libertou das cadeias e nos comprou com preço altíssimo — o sangue de seu Filho.
Liberdade em Cristo
Cristo nos libertou para a liberdade. Aquele a quem o Filho liberta é verdadeiramente livre. O Redentor quebra toda cadeia.
म्हणून जर पुत्राने तुम्हास बंधनमुक्त केले तर तुम्ही, खरोखर, बंधनमुक्त व्हाल.
या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मोकळे केले आहे म्हणून त्यामध्ये तुम्ही टिकून राहा आणि दासपणाच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.
सीयोनेच्या उद्धाराचे शुभवृत्त
प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे.
ह्यासाठी की दिनांस सुवार्ता सांगावी आणि भग्नहृदयाच्या लोकांस बरे करावे.
पाडाव केलेल्यास मुक्तता आणि बंदिवानांस मोकळीक गाजवून सांगावी.
पवित्र आत्म्याप्रमाणे चालणे
म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही. ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. कारण, ख्रिस्त येशूतील जीवनाच्या पवित्र आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले.
Redenção e salvação
Deus nos redimiu por amor. Ele apagou nossas transgressões e nos salvou não por mérito nosso, mas por sua misericórdia.
मी तुझी बंडखोरीची कृत्ये, दाट ढगाप्रमाणे आणि तुझे पाप आभाळाप्रमाणे, पुसून टाकली आहेत;
माझ्याकडे माघारी ये, कारण मी तुला उद्धारीले आहे."
ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील."
आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करावेत.
पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे, आता तुम्हास पवित्रीकरण हे फळ आहे आणि शेवटी सार्वकालिक जीवन आहे.
Refúgio e proteção
O Redentor é nosso refúgio e fortaleza. Ele livra os que clamam, sara os quebrantados e se alegra por nós com cântico.
दाविदाचे गाइलेले मुक्तीगीत
"हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो."
परमेश्वर माझा खडक माझा गढ आहे, जो मला सुरक्षा देतो, तो माझा देव, माझा खडक आहे, त्याच्यात मी आश्रय घेतो.
तो माझी ढाल आहे, माझ्या तारणाचे शिंग आणि माझा बळकट दुर्ग आहे.
श्रद्धेसंबंधी साक्ष
हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे,
कधीच माझी निराशा होऊ देऊ नकोस.
तुझ्या न्यायात मला वाचव.
माझे वेळ तुझ्या हातात आहे.
मला माझ्या शत्रूंच्या आणि जे माझा पाठलाग करतात त्यांच्या हातातून सोडव.
नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो,
आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल.
जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे.
आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो.
नितीमानाचे कष्ट पुष्कळ आहेत,
परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल.
हे आमच्या तारणाऱ्या देवा, तू आपल्या नावाच्या गौरवाकरता, आम्हास मदत कर;
आम्हास वाचव आणि आपल्या नावाकरता आमच्या पापांची क्षमा कर.
मी तुझी स्तवने गाताना माझे ओठ हर्षाने
आणि जो माझा जीव तू खंडून घेतला तोही जल्लोष करील.
जे तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता, ते तुम्ही वाईटाचा द्वेष करा,
तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करतो,
आणि तो त्यास दुष्टांच्या हातातून सोडवतो.
हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात,
आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.
Vestidos de salvação
O Redentor nos veste com roupas de salvação e manto de justiça. Ele se alegra por nós e nos cobre com seu amor.
मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव अतीशय आनंदीत होतो.
कारण जसा पती फेटा घालून आपणाला सुशोभित करतो, आणि नवरी जशी अलंकाराणे स्वतःला भूषित करते,
तशी त्याने मला तारणाचे वस्रे नेसवली आहेत, मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.
परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील,
तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल.
तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील.