Redentor
Deus é o nosso Redentor. Ele nos resgatou da escravidão do pecado, nos libertou das cadeias e nos comprou com preço altíssimo — o sangue de seu Filho.
Liberdade em Cristo
Cristo nos libertou para a liberdade. Aquele a quem o Filho liberta é verdadeiramente livre. O Redentor quebra toda cadeia.
म्हणून पुत्राने तुम्हाला स्वतंत्र केले, तरच तुम्ही खरोखर स्वतंत्र व्हाल.
ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य
ख्रिस्ताने स्वातंत्र्यासाठी आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यामध्ये स्थिर राहा व पुन्हा दास्यत्वाच्या जोखडाखाली सापडू नका.
याहवेहच्या कृपेचे वर्ष
सार्वभौम याहवेहचा आत्मा मजवर आहे,
कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी
याहवेहने माझा अभिषेक केला आहे.
भग्नहृदयी लोकांचे सांत्वन करण्यासाठी,
कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी
व अंधकारातून बंदिवानांना मुक्त करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.
आत्म्याद्वारे जीवन
यास्तव, जे आता ख्रिस्त येशूंमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही. कारण ख्रिस्त येशूंच्याद्वारे आत्म्याच्या नियमाने जे तुम्हाला जीवन देतात, त्यांनी तुम्हाला पापाचे नियम व मरण यातून मुक्त केले आहे.
Redenção e salvação
Deus nos redimiu por amor. Ele apagou nossas transgressões e nos salvou não por mérito nosso, mas por sua misericórdia.
मी तुझी पापे आकाशातील मेघांप्रमाणे,
सकाळच्या धुक्याप्रमाणे विरून टाकली आहेत.
माझ्याकडे परत ये,
मी खंडणी भरून तुला मुक्त केले आहे."
ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तेच आपल्या लोकांचे त्यांच्या पापांपासून तारण करतील."
त्यांनीच स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला प्रत्येक अधर्मापासून मुक्त केले, त्यांनी स्वतःसाठी शुद्ध करून त्यांच्या चांगल्या कार्यासाठी आपल्याला उत्साही प्रजा बनविले.
पण आता तुम्ही पापाच्या सत्तेपासून मुक्त झाला असून परमेश्वराचे दास झाला आहात, आणि जो लाभ तुम्हाला मिळाला आहे तो पावित्र्याकडे नेतो व त्याचा परिणाम सार्वकालिक जीवन आहे.
Refúgio e proteção
O Redentor é nosso refúgio e fortaleza. Ele livra os que clamam, sara os quebrantados e se alegra por nós com cântico.
याहवेह, माझे सामर्थ्य, माझे तुमच्यावर प्रेम आहे.
याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे;
माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो,
माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग ते माझे शरणस्थान आहेत.
याहवेह, मी केवळ तुमच्याच ठायी आश्रय घेतला आहे;
मला कधीही लज्जित होऊ देऊ नका;
आपल्या नीतिमत्वानुसार मला सोडवा.
माझे दिवस तुमच्याच हातात आहेत.
माझ्या शत्रूंच्या हातातून,
माझा पाठलाग करणार्यांपासून तुम्हीच मला सोडवा.
याहवेह नीतिमानाचा धावा ऐकून,
त्यांना सर्व संकटामधून सोडवितात.
याहवेह भग्नहृदयी लोकांच्या अगदी जवळ असतात
आणि जे पश्चात्तापी आत्म्याचे आहेत त्यांचे ते तारण करतात.
नीतिमानावर संकटे येत नाहीत असे नाही,
परंतु याहवेह त्याला प्रत्येक संकटातून सोडवितात.
हे आमच्या उद्धारक परमेश्वरा,
तुमच्या नावाच्या गौरवाकरिता आम्हाला साहाय्य करा;
तुमच्या नामाकरिता
आमची पापक्षमा करा व आम्हाला मुक्त करा.
हर्षभराने माझे ओठ तुमचा जयजयकार करतील
आणि तुम्ही माझा उद्धार केला
म्हणून मी तुमची स्तुतिस्तोत्रे उच्चस्वराने गाईन.
याहवेहवर प्रीती करणारे वाईटाचा द्वेष करोत,
कारण ते त्यांच्या भक्तांच्या जिवाचे रक्षण करतात
आणि दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवितात.
हे याहवेह,
असत्य बोलणार्या ओठांपासून
व कपटी जिव्हेपासून माझा बचाव करा.
Vestidos de salvação
O Redentor nos veste com roupas de salvação e manto de justiça. Ele se alegra por nós e nos cobre com seu amor.
मी याहवेहमध्ये अत्यानंदित होतो;
माझा आत्मा माझ्या परमेश्वरात हर्षोल्हासित होतो.
जसे वराचे मस्तक याजकाप्रमाणे विभूषित केले जाते,
किंवा वधू दागिन्यांनी स्वतःला अलंकृत करते,
तशी त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत
आणि नीतिमत्वाच्या अंगरख्याने मला आच्छादले आहे.
महाप्रतापी योद्धा जे रक्षणकर्ता आहेत,
ते याहवेह तुझे परमेश्वर तुझ्यासह आहेत.
त्यांना तुझ्यामुळे अत्यंत आनंद होतो;
तुझ्यावरील प्रीतीमुळे ते तुजवर दोषारोपण करणार नाहीत.
त्याऐवजी तुझ्याबद्दल ते गीत गाऊन उल्हास व्यक्त करतील."