Reino
O Reino de Deus é o tema central da pregação de Jesus. Desde o início de seu ministério, Ele proclamou: 'Arrependei-vos, porque é chegado o Reino dos céus.'
O anúncio do Reino
Jesus inaugurou seu ministério proclamando a chegada do Reino. Ele convida todos ao arrependimento e à fé nessa nova realidade.
तेव्हापासून येशूंनी उपदेश करण्यास सुरुवात केली, "पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे."
ते म्हणाले, "वेळ आली आहे," व "परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि शुभवार्तेवर विश्वास ठेवा!"
आजार्यांस बरे करा आणि त्यांना सांगा, ‘परमेश्वराचे राज्य आता तुमच्याजवळ आले आहे.’
पर्वतावरून शुभवार्ता आणणार्याचे पाय किती मनोरम आहेत,
जे आनंददायी वार्ता आणतात,
जे शांतीची घोषणा करतात,
जे शुभ संदेश आणतात,
जे तारणाची घोषणा करतात,
जे सीयोनास म्हणतात,
"तुमचे परमेश्वर राज्य करतात!"
A natureza do Reino
O Reino de Deus é governo soberano do Senhor sobre todas as coisas. Ele é o Rei eterno, imortal e invisível.
जे सर्वकाळचे राजा, अविनाशी व अदृश्य असे एकच परमेश्वर यांना सदासर्वकाळ सन्मान आणि गौरव असो. आमेन.
याहवेह, तुमचे सामर्थ्य व महिमा महान आहे;
गौरव, वैभव व ऐश्वर्य ही सदासर्वकाळ तुमचीच असो,
पृथ्वीवरील व स्वर्गातील सर्वकाही तुमचेच आहे!
याहवेह, हे सर्व तुमचेच राज्य आहे;
तुमचे प्रभुत्व सर्वांवर आहे.
हा गौरवशाली राजा कोण आहेत?
सर्वशक्तिमान याहवेह—
तेच आहेत गौरवशाली राजा. सेला
कारण याहवेह आमचे न्यायाधीश आहेत,
याहवेह आम्हाला कायदा प्रदान करणारे आहेत,
याहवेह आमचे राजा आहेत;
तेच आम्हाला वाचविणार आहेत.
तेव्हा याहवेह सर्व पृथ्वीचे राजा होतील. त्या दिवशी फक्त एकच याहवेह असतील व केवळ त्यांच्याच नामाची उपासना होईल.
Entrar no Reino
Para entrar no Reino é preciso nascer de novo, tornar-se como criança e buscar primeiro a justiça de Deus acima de tudo.
त्यावर येशूंनी उत्तर दिले, "मी तुला निश्चित सांगतो, नवीन जन्म झाल्याशिवाय कोणालाही परमेश्वराचे राज्य पाहता येणार नाही."
येशूंनी उत्तर दिले, "मी तुला निश्चित सांगतो, पाण्याने आणि पवित्र आत्म्याने जन्म झाल्याशिवाय कोणीही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही.
परंतु तुम्ही प्रथम त्यांचे राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील.
येशू शिष्यांना म्हणाले, "लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका; कारण स्वर्गाचे राज्य अशांचेच आहे."
धन्य आहेत ते, ज्यांचा नीतिमत्वासाठी छळ करण्यात येतो,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन; पृथ्वीवर जे काही तू बंद करशील ते स्वर्गात बंद केले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल."
Cidadãos do Reino
Os cristãos são concidadãos dos santos e membros da família de Deus, chamados a viver dignamente do Reino que receberam.
या कारणाने तुम्ही आता परदेशी आणि परके नाही, तर परमेश्वराच्या लोकांबरोबर सहनागरिक आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य झाला आहात. तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या भक्कम पायावर बांधलेले आहात, ज्याची मुख्य कोनशिला ख्रिस्त येशू आहेत.
"हे लहान कळपा, तू भिऊ नकोस कारण तुम्हाला राज्य देण्यास पित्याला आनंद होतो.
पहिल्या पुनरुत्थानात जे वाटेकरी होतात, ते धन्य आणि पवित्र आहेत, कारण दुसर्या मरणाची त्यांच्यावर सत्ता राहणार नाही. ते परमेश्वराचे व ख्रिस्ताचे याजक होऊन ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.
अशा वाईट गोष्टी करणार्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. व्यभिचारी, मूर्तिपूजक, जारकर्मी आणि पुमैथुनी, चोर, लोभी, मद्यपी, चहाडखोर आणि दरोडेखोर यांनाही परमेश्वराच्या राज्यात वाटा मिळणार नाही.