Descansar no Senhor
Descansar no Senhor é um ato de fé. Em um mundo agitado, Deus nos convida a entregar nossas ansiedades, aquietar o coração e confiar plenamente em sua provisão e cuidado.
O convite ao descanso
Jesus convida os cansados e sobrecarregados a irem a Ele e encontrar descanso para as suas almas. O jugo dele é leve.
"जे तुम्ही थकलेले आणि भाराक्रांत आहात, ते तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल. कारण माझे जू हलके व माझे ओझे सहज पेलवणारे आहे."
याहवेहसमोर निश्चिंत राहा
व धीराने त्यांची वाट पाहा;
जेव्हा लोकांना त्यांच्या मार्गात यश मिळते,
त्यांच्या दुष्ट योजना सफल होतात, तेव्हा तू संतापू नकोस.
ते म्हणतात, "शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा;
राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल.
पृथ्वीवर माझी महिमा होईल."
माझ्या लोकांनो, तुम्ही सर्वकाळ त्यांच्यावर भरवसा ठेवा;
आपले हृदय त्यांच्यापुढेच मोकळे करा,
कारण परमेश्वरच आमचे आश्रयस्थान आहेत. सेला
Confiança e paz
Quem confia no Senhor encontra paz perfeita. A ansiedade perde o poder quando entregamos tudo nas mãos do Deus soberano.
ज्यांचे मन स्थिर आहे,
त्या तुम्हाला परिपूर्ण शांती मिळेल,
कारण ते तुमच्यावर भरवसा ठेवतात.
सार्वभौम याहवेह, इस्राएलचे पवित्र परमेश्वर असे म्हणतात:
"पश्चात्ताप आणि विश्रांती करणे हेच तुमचे तारण आहे,
शांतता राखणे आणि विश्वास ठेवणे यामध्ये तुमचे सामर्थ्य आहे,
परंतु यापैकी तुम्हाकडे काहीही नसेल.
शांती नीतिमत्तेचे फळ असेल;
नीतिमत्तेचे कार्य तर सार्वकालिक शांतता आणि धैर्य आहे.
पण जे याहवेहवर आशा ठेवतात
ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात,
ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील;
ते धावतील पण दमणार नाहीत,
ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.
आणि परमेश्वराची शांती, जी आपल्या सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे विचार आणि तुमची मने ख्रिस्त येशूंमध्ये राखील.
तुमच्या सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण ते तुमची काळजी घेतात.
Esperar no Senhor
Esperar no Senhor renova as forças. A Bíblia nos ensina que aquietar-se diante de Deus e confiar em seu tempo é marca da maturidade espiritual.
याहवेहची प्रतीक्षा कर;
हिंमत बांध, धैर्य धर;
आणि याहवेहचीच प्रतीक्षा कर.
मी धीराने याहवेहची वाट पाहिली;
तेव्हा त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले आणि माझी आरोळी ऐकली.
तू आपला भार याहवेहवर टाक
आणि ते तुला आधार देतील;
नीतिमानाला ते कधीही
विचलित होऊ देणार नाही.
भीती बाळगा आणि पाप करू नका.
बिछान्यावर असता शांत अंतःकरणाने
त्यांचे चिंतन करा. सेलाह
जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात,
आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत.
याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणे
हितकारक आहे.
A fidelidade de Deus
Deus é fiel. Seus planos são de paz e esperança. Podemos descansar sabendo que Ele guarda e sustenta quem nele confia.
याहवेह असे जाहीर करतात, "कारण मी तुमच्यासाठी केलेल्या योजना मला माहीत आहेत, त्या योजना तुमच्या भल्यासाठी आहेत, वाईटासाठी नाहीत, तुम्हाला आशा व उज्वल भविष्यकाळ देण्याच्या त्या योजना आहेत. मग तुम्ही माझ्याकडे याल व माझी प्रार्थना कराल, तेव्हा त्या मी ऐकेन. तुम्ही माझा शोध कराल, मनापासून माझा शोध कराल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन."
"परंतु जो मनुष्य याहवेहवर भरवसा ठेवतो,
जो फक्त याहेवेहवर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादित असो,
ते पाण्याच्या जवळ लावलेल्या झाडासारखे आहेत.
त्याची मुळे खोलवर पाण्यात गेलेली असतात.
या झाडाला उष्णतेचे भय वाटत नाही;
त्याची पाने सदा हिरवी राहतात.
अवर्षणाच्या वर्षांची त्याला काळजी वाटत नाही.
आणि ते आपली रसाळ फळे देण्याचे कधीच थांबत नाही."
यावर याहवेहने उत्तर दिले, "माझी समक्षता तुझ्याबरोबर जाईल आणि मी तुला विसावा देईन."
याच कारणामुळे मी येथे तुरुंगात दुःख सोशीत आहे. पण मला त्याची मुळीच लाज वाटत नाही, कारण ज्यांच्यावर माझा विश्वास आहे, त्यांना मी चांगला ओळखतो आणि माझी खात्री आहे की मी त्यांच्याकडे सोपविलेली माझी ठेव त्यांच्या त्या दिवसापर्यंत राखून ठेवण्यास ते समर्थ आहे.
तो यहूदीयांना म्हणाला, "चला, आपण या गावांची बांधणी करू या आणि त्यांच्याभोवती बुरूज, फाटके आणि गज लावूया. भूमी अजूनही आमची आहे, कारण आम्ही आमचे परमेश्वर याहवेहचा आश्रय घेतला आहे; आम्ही त्यांचा आश्रय घेतला आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक बाजूंनी विश्रांती दिली आहे." म्हणून त्यांनी ते बांधले आणि समृद्ध झाले.
नगराच्या कडेने चालत असताना, शमुवेल शौलास म्हणाला, "सेवकाला सांग, की त्याने आपल्यापुढे चालावे." आणि सेवकाने त्याप्रमाणे केले; "परंतु तू थोडा वेळ येथेच राहा म्हणजे मी परमेश्वराचा संदेश तुला देईन."