Salvador
Jesus é o Salvador do mundo. Desde a manjedoura até a cruz e a ressurreição, toda a Escritura aponta para Aquele que veio buscar e salvar o que se havia perdido.
O Salvador nasceu
Na plenitude dos tempos, Deus enviou seu Filho ao mundo. O anjo declarou: 'Hoje vos nasceu um Salvador, que é Cristo, o Senhor.'
आज दावीदाच्या नगरात तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे; तोच ख्रिस्त प्रभू आहे.
ते खुद्द परमेश्वराच्या स्वरुपाचे असूनही
त्यांनी स्वतःस परमेश्वरासमान केले नाही
व परमेश्वरासम असण्याचा लाभ त्यांनी घेतला नाही;
उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले
आणि दासाचे स्वरूप घेऊन,
मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले.
मानवी रूप धारण करून
त्यांनी स्वतःस लीन केले,
येथपर्यंत की आज्ञापालन करून ते मरावयास,
आणि तेही क्रूसावरील मरण पत्करण्यास तयार झाले.
"तू इजिप्तमधून बाहेर आल्यापासून
मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे;
माझ्याशिवाय इतर कोणत्याही परमेश्वराला तू स्वीकारणार नाहीस,
माझ्याशिवाय इतर कोणीही तारणारा नाही.
O sacrifício redentor
Jesus deu a própria vida por nós. Ele é a propiciação pelos nossos pecados e o autor da salvação eterna para todos os que lhe obedecem.
तेच आपल्या पापांसाठी प्रायश्चिताचा यज्ञ आहेत आणि केवळ आपल्यासाठीच नाही तर सर्व जगाच्या पापांसाठीसुद्धा आहेत.
प्रीती हीच आहे: आपण परमेश्वरावर प्रीती केली असे नाही तर त्यांनी आपणावर प्रीती केली आणि आपल्या पापांसाठी त्यांच्या पुत्राला प्रायश्चिताचा बळी म्हणून पाठविले.
आपण परमेश्वराचे शत्रू असताना, त्यांच्या पुत्राच्या मरणाद्वारे आपला समेट झाला, त्याअर्थी समेट झाल्यानंतर, कितीतरी अधिक त्यांच्या जीवनाद्वारे तारले जाऊ!
तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांपासून परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून चांदी किंवा सोने अशा नाशवंत वस्तूंनी तुमची सुटका केली नाही, परंतु निष्कलंक आणि निर्दोष कोकरा, जे ख्रिस्त त्यांच्या मौल्यवान रक्ताने झाली.
त्यांच्यामध्ये परमेश्वराच्या विपुल कृपेद्वारे व त्यांच्या रक्ताद्वारे खंडणी म्हणून आपल्याला पापांची क्षमा देऊन
मी ख्रिस्ताबरोबर क्रूसावर खिळलेला आहे आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतात. मी आता जे जीवन शरीरात जगतो ते मी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवून जगतो, ज्यांनी माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्यासाठी दिले.
O caminho da salvação
Jesus é o mediador da nova aliança. Ele vive para interceder por nós e pode salvar perfeitamente todos os que se achegam a Deus por meio dele.
आणि परिपूर्ण केल्यामुळे, त्यांच्या आज्ञा मानणार्या सर्वांचे अनंतकाळचे तारणकर्ता झाले,
यास्तव त्यांच्याद्वारे परमेश्वराकडे येणार्या सर्वांचे पूर्णपणे तारण करण्यास ते समर्थ आहेत, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास ते सदासर्वदा जिवंत आहेत.
याकारणास्तव ख्रिस्त हे नव्या कराराचे मध्यस्थ आहेत, ज्यांना पाचारण झाले आहे, त्यांनी जुन्या करारानुसार जी पापे केली, त्यांच्या शिक्षेपासून मुक्ती मिळावी म्हणून ख्रिस्ताने स्वतःच्या मृत्यूद्वारे खंडणी भरून त्यांना सोडवावे व त्यांना सार्वकालिक जीवनाच्या वारसाचे अभिवचन मिळावे.
आपण आपल्या विश्वासाचा अग्रेसर व पूर्तता करणार्या येशूंवर आपले नेत्र स्थिर करावे; कारण त्यांना त्याजपुढे जो आनंद दिसत होता, त्याकरिता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि ते परमेश्वराच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे.
कारण सर्वांनी पाप केले आहे, आणि परमेश्वराच्या गौरवाला अंतरले आहेत, आता परमेश्वराच्या कृपेने, ख्रिस्त येशूंच्याद्वारे खंडणी भरून आपल्याला मुक्त केले आणि विनामूल्य नीतिमान म्हणून जाहीर केले आहे.
परंतु परमेश्वराने आजपर्यंत मला साहाय्य केले; म्हणूनच प्रत्येक लहानथोरास या गोष्टींची साक्ष सांगण्यास मी येथे उभा आहे व ज्यागोष्टी घडतील असे संदेष्टे व मोशे यांनी सांगितले होते, त्यापलीकडे मी दुसरे काहीही सांगितले नाही. त्यांनी सांगितले होते की ख्रिस्त दुःख सहन करतील आणि यहूदी व गैरयहूदी अशा दोघांनाही प्रकाशाचा संदेश मिळावा म्हणून तेच प्रथम मरणातून पुन्हा उठतील."
देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, "भिऊ नका, क्रूसावर खिळलेल्या येशूंना तुम्ही शोधीत आहात, हे मला माहीत आहे. ते येथे नाहीत; त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उठले आहेत. या आणि ज्या ठिकाणी त्यांना ठेवले होते ती जागा पाहा.
मला ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे,
आणि अखेरीस ते पृथ्वीवर उभे राहील;