Saúde
A saúde é uma bênção de Deus. A Bíblia ensina que Deus é nosso curador, que devemos cuidar do corpo como templo do Espírito e que a alegria do Senhor renova nossas forças.
Deus, o nosso curador
O Senhor é quem sara todas as nossas doenças. Ele prometeu abençoar o pão e a água e tirar as enfermidades do meio do seu povo.
तू आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावीस; म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल. मी तुमच्यामधून रोगराई दूर करीन.
तो भग्नहृदयी जनांना बरे करतो,
आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो.
रोग्यांना बरे करा, मरण पावलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा आणि भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या.
येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, "वैद्याची गरज जे निरोगी आहेत त्यांना नाही, तर जे आजारी आहेत त्यांना आहे.
O corpo como templo
Nosso corpo é templo do Espírito Santo. A Bíblia nos encoraja a cuidar da saúde física com disciplina e reverência a Deus.
किंवा तुम्ही हे जाणत नाही का की, तुमचे शरीर हे देवाकडून मिळालेल्या व तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे? आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही? कारण तुम्हास मोल देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.
कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.
प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करतो.
तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नकोस;
परमेश्वराचे भय धर आणि वाईटापासून दूर राहा.
हे तुझ्या शरीराला आरोग्य
आणि तुझ्या हाडांना सत्व असे होईल.
A alegria que cura
O coração alegre é bom remédio. A esperança do coração traz alegria, e as palavras agradáveis são como favo de mel — doçura para a alma e saúde para o corpo.
आनंदी हृदय हे चांगले औषध आहे.
पण तुटलेला आत्मा हाडे शुष्क करतो.
आनंदी शब्द मधाचे पोळ अशी आहेत,
ती जिवाला गोड व हाडांस आरोग्य आहेत.
जेव्हा आशा लांबणीवर पडते तेव्हा अंतःकरण तुटते,
परंतु इच्छा पूर्ण होते तेव्हा ते जीवनाचे झाड आहे.
यास्तव आपल्या मनातून राग दूर कर,
आणि आपल्या शरीरातील वेदनेकडे लक्ष देऊ नको.
कारण तारुण्य व सामर्थ्य ही व्यर्थ आहेत.