Temor do Senhor
O temor do Senhor é o princípio da sabedoria. Não se trata de medo, mas de reverência profunda, respeito e admiração diante da santidade e grandeza de Deus.
O princípio da sabedoria
A Escritura afirma que temer ao Senhor é o primeiro passo para a verdadeira sabedoria. Quem teme a Deus discerne o certo e aprende a viver com prudência.
याहवेहचे भय सुज्ञानाचा प्रारंभ होय;
त्यांच्या नियमाचे पालन करणार्यांना उत्तम आकलन शक्ती प्राप्त होते.
याहवेहची सदासर्वकाळ स्तुती होवो.
याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय,
आणि पवित्र परमेश्वराचे ज्ञान असणे हा सुज्ञपणा होय.
याहवेहचे भय धरणे हेच सुज्ञतेचे शिक्षण होय,
आणि सन्मान मिळण्याआधी विनम्रता येते.
याहवेहने सर्व मानवजातीला म्हटले,
"प्रभूचे भय—हेच ज्ञान आहे,
वाईटापासून दूर राहणे हीच सुज्ञता होय."
याहवेहचे भय निर्मळ आहे,
ते सर्वकाळ टिकणारे आहेत.
याहवेहचे निर्णय स्थिर आहेत,
आणि ते सर्व पूर्णतः नीतिमान आहेत.
सोन्यापेक्षा ते अधिक मौल्यवान आहेत,
अतिशुद्ध सोन्यापेक्षाही;
ते मधापेक्षा मधुर आहेत,
पोळ्यातील मधाहूनही ते अधिक गोड आहेत.
कारण ते तुमच्या सेवकांस सावध करतात;
त्याचे पालन करणार्यास मोठे प्रतिफळ मिळते.
Bênçãos do temor
Quem teme ao Senhor encontra vida longa, provisão e proteção. O temor de Deus nos guarda do mal e nos conduz à humildade.
याहवेहचे भय ही नम्रता आहे;
त्याचे वेतन संपत्ती, सन्मान व दीर्घायुष्य आहे.
याहवेहचे भय बाळगल्याने मनुष्याचे आयुष्य वाढते,
परंतु दुष्टांच्या आयुष्याची वर्षे कमी केली जातील.
याहवेहचे भय म्हणजे जीवनाचा झरा आहे,
ते मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवते.
दया व सत्य यामुळे पापांचे प्रायश्चित होते;
आणि याहवेहचे भय धरल्यामुळे दुष्टता टाळली जाते.
परमेश्वराबद्दल नेहमी भय बाळगणारा मनुष्य धन्य,
परंतु मन कठोर करणारा संकटात सापडतो.
याहवेह किती चांगले आहेत याचा अनुभव घ्या;
जे त्यांच्यावर भाव ठेवतात ते धन्य.
याहवेहची पवित्र प्रजा, त्यांचे भय बाळगा,
कारण जे त्यांचे भय बाळगतात, त्यांना काही उणे पडत नाही.
Vivendo no temor do Senhor
Temer ao Senhor é obedecer seus mandamentos, andar em seus caminhos e amá-lo de todo coração. Essa reverência se expressa em justiça e integridade.
याहवेह तुमच्या परमेश्वराचेच तुम्ही अनुसरण करावे व त्यांचेच भय बाळगावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, त्यांची वाणी ऐकावी; त्यांची सेवा करावी व त्यांनाच बिलगून राहावे.
याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करा, त्यांच्या आज्ञेत राहा आणि त्यांचा आदर करा.
भय धरून याहवेहची सेवा करा!
थरथर कापत त्यांच्या शासनाचा सन्मान करा.
माझ्या लेकरांनो या आणि माझे ऐका;
याहवेहचे भय कसे धरावे, हे मी तुम्हाला शिकवेन.
तुमच्यापैकी जो जीवनावर प्रीती करतो
आणि अनेक चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो,
तर तू आपली जीभ वाईटापासून
आणि आपले ओठ असत्य बोलण्यापासून राखावे.
वाईटाचा त्याग कर आणि चांगले ते कर;
शांतीचा शोध घे व तिच्यामागे लाग.
आता याहवेहचे भय तुम्हावर असू द्या, काळजीपूर्वक न्याय करा, कारण आमचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे अन्याय किंवा पक्षपात किंवा लाचलुचपत असे काही चालत नाही."
" ‘तुम्ही बहिर्यांना शाप देऊ नये किंवा आंधळ्याच्या समोर अडखळण ठेवू नये, परंतु तुमच्या परमेश्वराची भीती बाळगावी. मी याहवेह आहे.
एकमेकांचा गैरफायदा घेऊ नका, तर तुमच्या परमेश्वराचे भय बाळगा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
" ‘जर तुमच्या कोणी इस्राएल बंधूला दारिद्र्य आले आणि ते तुमच्यामध्ये स्वतःचे पालनपोषण करू शकत नसतील, तर जसे तुम्ही परदेशी आणि परक्यांना मदत कराल तशी त्यांना करा, जेणेकरून ते तुमच्यामध्ये राहतील. परमेश्वराची भीती बाळगावी आणि तुमच्या बंधूला तुमच्या घरात राहू द्यावे. त्याला उसने म्हणून दिलेल्या पैशावर तुम्ही व्याज घेऊ नये.
"माझ्या मित्रांनो, जे शरीराचा नाश करतात व त्यानंतर काही करण्यास समर्थ नाहीत अशांना भिऊ नका. कोणाचे भय बाळगावे, हे मी तुम्हाला सांगतो: शरीराचा वध केल्यानंतर, नरकात टाकण्याचा ज्याला अधिकार आहे, त्याची भीती बाळगा. होय, मी सांगतो त्याचीच भीती बाळगा.