Sobre ter filhos
Filhos são uma dádiva do Senhor, uma herança que Deus confia aos pais. A Bíblia celebra a maternidade e a paternidade como vocações sagradas e fontes de bênção.
Filhos: herança do Senhor
A Escritura declara que os filhos são bênção de Deus. Cada criança é um presente precioso confiado aos pais para ser cuidado com amor.
पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे,
आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे.
तरुणपणाची मुले हे वीराच्या
हातातील बाणांसारखी आहेत.
ज्या मनुष्याचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य!
तो वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता,
ते फजीत होणार नाहीत.
तुझी पत्नी तुझ्या घरात
फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल;
तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या
जैतूनाच्या रोपांसारखी होतील.
अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा.
देवाने त्यांना आशीर्वाद दिला, आणि त्यांना म्हटले, "फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा."
Instruir nos caminhos de Deus
A Bíblia orienta os pais a instruir seus filhos nos caminhos do Senhor desde cedo, com dedicação, disciplina e exemplo.
मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे,
आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.
म्हणून सांगतो या आज्ञा लक्षात ठेवा. त्या हृदयात साठवून ठेवा. त्या लिहून ठेवा. आणि लक्षात राहण्यासाठी हातावर चिन्हादाखल बांधा व कपाळावर लावा. आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा. घरीदारी, झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा.
वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; नाही तर, कदाचित ती निरुत्साही होतील.
आपल्या मुलाला शिस्त लाव आणि तो तुला विसावा देईल
आणि तो तुझा जीव आनंदित करील.
Cada vida é preciosa
Deus conhece e forma cada criança no ventre. Antes de nascer, Ele já nos separou e preparou um propósito para cada vida.
"मी तुला आईच्या उदरात घडवण्यापूर्वीच, मी तुला निवडले आहे,
आणि तू गर्भातून निघण्याआधीच मी तुला पवित्र केले आहे. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा असे केले आहे."
तू माझे अंतर्याम निर्माण केलेस;
तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले.
मी तुला धन्यवाद देतो,
कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत,
हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो.
मी गुप्तस्थळी निर्माण होत असता,
आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे
माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती.
तुझ्या शत्रूंमुळे, वैरी व सूड घेणाऱ्यांना तू शांत करावे म्हणून,
बाळांच्या आणि तान्ह्या मुलांच्या मुखात तू उपकारस्तुती उत्पन्न केली.
परंतु येशू म्हणाला, "लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे."