Sobre ter filhos
Filhos são uma dádiva do Senhor, uma herança que Deus confia aos pais. A Bíblia celebra a maternidade e a paternidade como vocações sagradas e fontes de bênção.
Filhos: herança do Senhor
A Escritura declara que os filhos são bênção de Deus. Cada criança é um presente precioso confiado aos pais para ser cuidado com amor.
मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे,
प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे.
तरुणपणी झालेली मुले,
शूरवीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.
ज्या पुरुषाचा भाता
अशा बाणांनी भरलेला आहे, तो धन्य!
असे पुरुष वेशीत आपल्या शत्रूशी न्यायालयात वाटाघाटी करतील,
तेव्हा ते लज्जित होणार नाहीत.
तुझी पत्नी तुझ्या घरात
सफल द्राक्षवेलीसारखी होईल;
तुझी मुले तुझ्या मेजाभोवती
जैतुनाच्या रोपांसारखी होतील.
ते निपुत्रिक गृहिणीला तिच्या घरात स्थिरावतात,
आणि तिला मुले देऊन आनंदी माता बनवितात.
याहवेहचे स्तवन करा.
मग परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांना म्हणाले, "फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणार्या प्रत्येक सजीव प्राण्यावर अधिकार गाजवा."
Instruir nos caminhos de Deus
A Bíblia orienta os pais a instruir seus filhos nos caminhos do Senhor desde cedo, com dedicação, disciplina e exemplo.
लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा,
म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत.
यास्तव माझ्या या आज्ञा काळजीपूर्वक आपल्या मनात आणि अंतःकरणात साठवून ठेवा; त्या तुम्ही आपल्या हातावर चिन्ह म्हणून बांधून ठेवा आणि आपल्या कपाळपट्टीवर बांधा. त्या आपल्या मुलांना शिकवा. घरी बसलेले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा.
वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका, नाही तर त्यांचे धैर्य खचेल.
तुमच्या बालकांना शिस्त लावा म्हणजे ते तुम्हाला शांती देतील;
ते तुम्हाला पाहिजे तो आनंद देतील.
Cada vida é preciosa
Deus conhece e forma cada criança no ventre. Antes de nascer, Ele já nos separou e preparou um propósito para cada vida.
"मी तुला गर्भाशयात घडविण्याच्या पूर्वीपासून ओळखतो,
तुझा जन्म होण्यापूर्वीच मी तुला समर्पित केले आहे;
आणि राष्ट्रांकरिता माझा संदेष्टा म्हणून तुझी नेमणूक केली आहे."
माझ्या शरीरातील अंतरंगाची घडण तुम्हीच केली आहे;
माझ्या मातेच्या उदरात माझी देहरचना केली.
मी तुमची स्तुती करतो,
कारण तुम्ही मला भयपूर्ण व अद्भुत रीतीने निर्माण केले आहे;
तुमचे हे कार्य किती अद्भुत आहे,
हे मी पूर्णपणे जाणतो.
गुप्तस्थानी माझी निर्मिती होत असताना,
जेव्हा माझा सांगाडा तुमच्यापासून लपलेला नव्हता,
जेव्हा पृथ्वीच्या गर्भामध्ये माझी घडण होत होती.
लेकरे आणि तान्ह्या बालकांच्या स्तुतीद्वारे
तुमचे शत्रू व विरोध्यांना शांत करण्यासाठी
शत्रूविरुद्ध बळ स्थापित केले आहे.
येशू शिष्यांना म्हणाले, "लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका; कारण स्वर्गाचे राज्य अशांचेच आहे."