Trabalho
O trabalho é uma ordenança divina desde a criação. Deus colocou o homem no jardim para cultivar e guardar, revelando que o labor é parte do propósito humano e um meio de glorificá-lo.
Trabalho como vocação divina
Deus nos criou para trabalhar com propósito. O trabalho é expressão da imagem divina em nós e deve ser feito como para o Senhor.
जे काही तुम्ही करता, ते पूर्ण मनाने करा, मनुष्यांसाठी नव्हे, तर प्रभूसाठी म्हणून करा.
जे काही तुम्ही करता, ते पूर्ण मनाने करा, मनुष्यांसाठी नव्हे, तर प्रभूसाठी म्हणून करा. हे तुम्हाला माहीत आहे की, प्रभूपासून तुम्हाला वारसा हे प्रतिफळ म्हणून मिळेल. तुम्ही प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत आहात.
आणि जी काही कृती तुम्ही कराल व जे बोलाल, ते सर्व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आणि त्यांच्याद्वारे परमेश्वर जो पिता त्यांची उपकारस्तुती करा.
ही सेवा लोकांची म्हणून नाही परंतु पूर्ण मनाने आपण जशी प्रभूची करतो अशी समजून करा. तुम्ही दास किंवा स्वतंत्र असला, तरी प्रत्येक चांगल्या गोष्टीचे वेतन प्रभू तुम्हा प्रत्येकाला देईल, हे लक्षात ठेवा.
तुम्ही जे खाता किंवा पिता किंवा जे काही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठीच करावे.
यास्तव, माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो, खंबीर व्हा आणि कशानेही विचलित होऊ नका. आपल्या स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या कार्यात वाहून घ्या, कारण तुम्हाला माहीत आहे की प्रभूमध्ये तुमचे श्रम कधीही व्यर्थ होणार नाही.
तुम्ही जे काही करता ते प्रीतीने करा.
Diligência e recompensa
A mão diligente enriquece, mas a preguiça traz pobreza. A Bíblia valoriza o esforço honesto, dedicado e perseverante em toda obra.
आळशी हात दरिद्री आणतो,
परंतु उद्योगी हात समृद्धी आणतो.
उद्योगी मनुष्यांचे हात सत्ता धारण करतील,
पण आळशी लोकांना गुलामगिरी प्राप्त होईल.
उद्योगी मनुष्यांचे हात सत्ता धारण करतील,
पण आळशी लोकांना गुलामगिरी प्राप्त होईल.
सर्व कष्टाच्या कामाने नफा मिळतो,
पण व्यर्थ बडबड भिकेला लावते.
अरे आळशा, मुंगीकडे जा;
तिचे मार्ग लक्षात घे आणि शहाणा हो!
तिला कोणीही अधिकारी,
मुकादम किंवा अधिपती नाही,
तरी ती तिचा अन्नसामुग्रींचा साठा उन्हाळ्यात करते
आणि कापणीच्या हंगामात तिचे अन्न गोळा करते.
परंतु हे आळशी माणसा, तू तिथे किती वेळ झोपून राहशील?
तुझ्या झोपेतून तू केव्हा जागा होणार आहेस?
आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी
उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती—
आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल
आणि हत्यारबंद मनुष्याप्रमाणे गरिबी येईल.
जो त्याचे काम करण्यात आळशी आहे,
तो विध्वंस करणार्याचा भाऊ आहे.
तू झोपेची आवड धरू नकोस, नाहीतर तू गरीब होत जाशील;
जागा राहा आणि तुझ्याकडे विपुल खाद्य शिल्लक राहील.
कपटाने मिळविलेला पैसा झिजून नाहीसा होतो,
पण जो हळूहळू कष्ट करून पैसे जमा करतो, तो त्यात वाढ करतो.
याहवेहच्या आशीर्वादाने धनसंपत्ती मिळते,
त्यासाठी दुःखद परिश्रम करावे लागत नाहीत.
Planejamento e excelência
A excelência no trabalho honra a Deus. Devemos nos dedicar com competência, entregar nossos planos ao Senhor e buscar o melhor em cada tarefa.
तुम्ही जे काही काम करता ते याहवेहकडे सोपवून द्या,
आणि ते तुमच्या योजना यशस्वी करतील.
तुम्ही जे काही काम करता ते याहवेहकडे सोपवून द्या,
आणि ते तुमच्या योजना यशस्वी करतील.
आपल्या कामात निपुण असणारी माणसे तू पाहिली आहे का?
ते खालच्या श्रेणीच्या अधिकार्यांसमोर नाही
तर राजांसमोर सेवा करतील.
तू सत्यवचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कोणतेही कारण नसलेला, परमेश्वराच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा तू स्वतःस परमेश्वराला सादर करण्याचा प्रयत्न कर.
तू सत्यवचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कोणतेही कारण नसलेला, परमेश्वराच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा तू स्वतःस परमेश्वराला सादर करण्याचा प्रयत्न कर.
संपूर्ण पवित्रशास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेले आहे आणि शिक्षण, निषेध, सुधारणा, नीतिमत्वाचे शिक्षण याकरिता उपयोगी आहे. यासाठी की, परमेश्वराचा सेवक पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.
जे काम तुझ्या हाताला सापडते, ते तुझ्या सर्व शक्तीने कर, कारण मृतलोकामध्ये, जिथे तुला जायचे आहे, तिथे ना काम आहे, ना योजना, ना विद्या, ना सुज्ञान.
जे काही कराल ते सर्व कुरकुर व वादविवाद न करता करा, म्हणजे, "तुम्ही या दुष्ट आणि कुटिल आणि हेकेखोर पिढीत दोषरहित व शुद्ध राहून परमेश्वराची लेकरे" म्हणून त्यांच्यामध्ये आकाशातील तार्यांप्रमाणे चमकाल.
O contentamento no trabalho
Deus nos dá a capacidade de desfrutar do nosso trabalho. Poder comer, beber e encontrar satisfação em nosso labor é um dom divino.
मला ठाऊक आहे की जिवंत असेपर्यंत मनुष्याने सुखी राहावे आणि दुसर्याचे हित करावे, यापेक्षा काहीही उत्तम नाही. प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपल्या कष्टाच्या कार्यात संतुष्ट राहावे—हे परमेश्वराने दिलेले दान आहे.
तरी एक चांगली गोष्ट मी पाहिली: मनुष्याने खावे, प्यावे व परमेश्वराने आपल्याला सूर्याखाली दिलेल्या या थोड्या दिवसाच्या कष्टमय जीवनात जे आहे, त्यात समाधान मानावे—हाच त्यांचा वाटा आहे.
आणि याशिवाय परमेश्वराने जर कोणा मनुष्याला संपत्ती आणि तिचा उपभोग घेण्यासाठी आरोग्य दिले असेल, तर त्यांनी त्या परिश्रमात आनंद करावा—हे त्यांना परमेश्वराचे दान आहे. आनंदाने काम करणे व जीवनात जे वाट्याला येईल त्यात समाधान मानणे, ही खरोखर परमेश्वराची देणगी आहे.
एकापेक्षा दोघेजण बरे!
कारण त्यांच्या कष्टाचे अधिक चांगले प्रतिफळ मिळेल:
एक एकटाच मनुष्य होता;
त्याला ना मुलगा होता ना भाऊ.
त्याच्या श्रमाला अंत नव्हता,
तरी त्याच्या डोळ्यात धनाने तृप्तता नव्हती.
तो विचारीत होता, "मी कोणासाठी हे श्रम करीत आहे,"
"आणि मी स्वतःला आनंदापासून का वंचित ठेवीत आहे?"
हे सुद्धा व्यर्थ आहे—
ही दैन्यावस्था आहे.
आणि मी हे पाहिले की, एखाद्याला दुसर्याविषयी असलेल्या मत्सराच्या भावनेतून कष्ट आणि सर्व यश संपादन करता येते. हे सुद्धा व्यर्थच आहे, वार्यामागे धावल्यासारखे आहे.
A responsabilidade cristã
O cristão deve trabalhar com suas próprias mãos, viver dignamente e ser exemplo de dedicação. Quem não trabalha, não coma.
आम्ही तुम्हाजवळ होतो, तेव्हाही तुम्हाला हाच नियम दिला होता: "जो कोणी काम करू इच्छित नाही, त्याने खाऊ नये."
तुमच्यापैकी काहींची जीवनशैली आळशी आहे आणि काही लोक व्यत्यय आणणारे व इतरांच्या कामात लुडबुड करतात असे आम्ही ऐकतो. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विनंती नव्हे, आज्ञा करतो की त्यांनी शांत व्हावे आणि आपल्या अन्नासाठी श्रम करावे.
शांतीने जीवन जगणे, आपल्या व्यवसायात मग्न असणे आणि स्वतःच्या हाताने काम करणे हे तुमचे ध्येय असू द्या, म्हणजे तुमचे दैनंदिन जीवन बाहेरील लोकांच्या सन्मानास पात्र ठरेल आणि तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
चोरी करणार्यांनी चोरी न करता आपल्या हातांनी चांगले व उपयोगी असे काम करावे, म्हणजे गरजवंत लोकांना देण्याकरिता त्यांच्याजवळ काहीतरी असेल.
परमेश्वर तुम्हाला विपुल आशीर्वाद देण्यास समर्थ आहे. ते तुम्हाला सर्ववेळी व सर्व गोष्टीत एवढे देतील की जे काही तुम्हाला गरजेचे आहे ते मिळेल व चांगल्या कामासाठी भरपूर शिल्लक राहील.
तेव्हा परमेश्वराच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे. जो कोणी परमेश्वराच्या विसाव्यात प्रवेश करतो, त्याने जसा परमेश्वराने त्यांच्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून सुद्धा विसावा घेतला आहे.
आमच्या प्रभू परमेश्वराची कृपा आम्हावर होवो;
आणि आमची सर्व कार्ये सुस्थिर होवोत—
होय, आमच्या हाताच्या कार्यास सुस्थिरता येवो.
आकाशातील पाखरांकडे पाहा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही व कोठारात साठवित नाही आणि तरी देखील तुमचे स्वर्गीय पिता त्यांना खायला घालतात. तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक मोलवान नाही का?
चांगले करण्याची आस्था असेल, तर सहसा कोणी तुम्हाला अपाय करणार नाही.
मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती मजवर विश्वास ठेवणाराही करेल, किंबहुना त्यापेक्षाही मोठी करेल, कारण मी पित्याकडे जात आहे.
तरीपण, माझे जीवन माझ्याकरिता मोलाचे नाही; माझे एकच ध्येय आहे की धाव संपविणे व जे कार्य प्रभू येशूंनी मला दिले आहे ते पूर्ण करणे म्हणजे परमेश्वराने जी कृपा केली आहे, त्याची शुभवार्ता इतरांना सांगणे हे होय.
आम्ही जे परिश्रम केले आहेत ते तुम्ही हरवू नये यासाठी जपा, परंतु तुम्हाला त्याचा संपूर्ण मोबदला मिळावा.