Uma só carne
O conceito de 'uma só carne' é o fundamento bíblico do casamento. Desde a criação, Deus uniu homem e mulher em uma aliança indissolúvel de amor, compromisso e intimidade.
A instituição divina do casamento
Deus criou o homem e a mulher e os uniu em aliança. O casamento é obra de Deus, e o que Ele juntou não separe o ser humano.
तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास गाढ झोप लागू दिली, आणि तो झोपला असता परमेश्वराने मनुष्याच्या शरीरातून एक बरगडी काढली व ती जागा मांसाने बंद केली. परमेश्वर देवाने मनुष्याची बरगडी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला मनुष्याकडे आणले. तेव्हा मनुष्य म्हणाला,
"आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व माझ्या मांसातले मांस आहे;
मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो,
कारण ती नरापासून बनवलेली आहे."
म्हणून मनुष्य आपल्या आई वडीलांस सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील.
नंतर परमेश्वर देव बोलला, "मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी सुसंगत मदतनीस निर्माण करीन."
देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला.
त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचा असा देवाने तो निर्माण केला.
नर व नारी असे त्यांना निर्माण केले.
येशूने उत्तर दिले, "पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की, जेव्हा देवाने जग उत्पन्न केले, त्यांना नर व नारी असे निर्माण केले. आणि देव म्हणाला, ‘म्हणून पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून व आपल्या पत्नीला जडून राहील. ती दोघे एकदेह होतील.’ म्हणून दोन व्यक्ती या दोन नाहीत तर एक आहेत. देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे. म्हणून कोणाही व्यक्तीने त्यांना वेगळे करू नये."
परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना नर व नारी असे निर्माण केले.
या कारणामुळे पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील.
आणि ती दोघे एकदेह होतील. म्हणून यापुढे ती दोन नाहीत तर एकदेह आहेत.
यासाठी देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने तोडू करू नये."
O mistério da união
Paulo ensina que a união conjugal é um grande mistério que aponta para Cristo e a Igreja. A intimidade reflete a comunhão espiritual plena.
याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नीवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वतःवर प्रेम करतो. कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा द्वेष केला नाही. उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो. कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. "म्हणून याकारणास्तव पुरूष त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील आणि ते दोघे एकदेह होतील." हे गुढ सत्य फार महत्त्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते. तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे व पत्नीनेही पतीचा मान राखला पाहिजे.
तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हास माहित नाही काय? मग मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते वेश्येचे अवयव करू काय? तसे न होवो. तुम्ही हे जाणत नाही का की, जो वेश्येशी जोडला जातो तो तिच्याशी शरीराने एक होतो? कारण तो म्हणतो की, ती दोघे एकदेह होतील. पण जो प्रभूशी जोडला जातो तो त्याच्याशी आत्म्याने एकरूप होतो.
आणि त्याच्या जवळ आत्म्याचे शेष होते तरी त्याने एक केले नाही काय? आणि त्याने तुम्हास एक का केले? कारण तो ईश्वरीय संततीची आशा बाळगत होता. म्हणून तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा, आणि कोणीही आपल्या तरूणपणाच्या पत्नी सोबत विश्वासघात करू नये.
Fidelidade e alegria
A aliança conjugal exige fidelidade, respeito e dedicação mútua. A Bíblia celebra a alegria da intimidade dentro do casamento.
तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो,
आणि तरुणपणी केलेल्या पत्नीसह तू संतुष्ट रहा.
कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे.
तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत;
तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा.
माझ्या मुला, व्यभिचारी स्त्रीने तुला कां आनंदित करावे;
तू परक्या स्त्रीच्या उराचे आलिंगन कां करावे?
पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता एक शरीर असे पाचारण्यांत आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा.
दैनदिनाचे नियम
‘म्हणून खोटे सोडून द्या. प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याबरोबर खरे तेच बोलावे कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत.