Valioso
Cada ser humano é precioso aos olhos de Deus. As Escrituras revelam que fomos criados à imagem divina, resgatados por alto preço e chamados para um propósito eterno.
O valor que Deus nos dá
Nosso valor não vem de conquistas ou aparências, mas do fato de sermos amados pelo Criador. Deus cuida até dos passarinhos — quanto mais de nós!
दोन चिमण्या एका नाण्याला विकत नाहीत काय? तरीही तुमच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही. आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत. म्हणून घाबरु नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात.
तर मग मनुष्य मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. म्हणून नियमशास्त्र लोकांस शब्बाथ दिवशी चांगले करण्याची मोकळीक देते."
पाच चिमण्या दोन नाण्यांना विकतात की नाही? तरी त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही. पण तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील त्याने मोजलेले आहेत. भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मूल्य जास्त आहे.
आकाशातील पक्ष्यांकडे पाहा! ती पेरीत नाहीत, कापणी करीत नाहीत किंवा कोठारात साठवूनही ठेवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात की नाही?
Preciosos aos olhos de Deus
O Senhor declara que somos preciosos e valiosos aos seus olhos. Ele nos chama de propriedade exclusiva e nos reveste de glória.
तू माझ्या दृष्टीने मोलवान आणि विशेष आहेस, मी तुझ्यावर प्रीती करतो;
म्हणून मी तुझ्याबद्दल लोक आणि तुझ्या जिवाबद्दल दुसरे लोक देईन.
म्हणून मी आता तुम्हास सांगतो की तुम्ही माझी वाणी खरोखर ऐकाल आणि माझ्या कराराचे पालन कराल, तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल. सर्व पृथ्वी माझी आहे.
सीयोनेचे भावी ऐश्वर्य
"उठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उगवले आहे."
O verdadeiro valor
A Bíblia nos ensina que a fé, a integridade e o caráter são mais valiosos que ouro ou prata. O que tem valor eterno transcende o material.
ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही आणि सुंता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.
विश्वासाचा करार आणि प्रामाणिकपणा तुला कधीही न सोडो,
त्यांना एकत्र करून आपल्या गळ्यात बांध,
ते आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.
म्हणजे तुला देवाच्या व मनुष्याच्या
दृष्टीने कृपा व सुकीर्ती ही मिळतील.
जो कोणी चांगले करतो त्याची जिव्हा शुध्द रुप्यासारखी आहे;
पण तेथे दुष्टाच्या हृदयात कवडी किंमत आहे.
सदगुणी स्त्री
हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल?
पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे.
मी माझ्या जीवनाविषयी काळजी करीत नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे, प्रभू येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे ते काम म्हणजे देवाच्या कृपेबद्दल ची सुवार्ता लोकांस सांगितली पाहिजे.