Vaso
A metáfora do vaso é uma das mais belas da Bíblia. Assim como o oleiro molda o barro, Deus nos forma segundo seus propósitos, fazendo de nós vasos úteis para sua glória.
Nas mãos do oleiro
Deus é o Oleiro e nós somos o barro. Ele tem autoridade e sabedoria para nos moldar conforme sua vontade perfeita, e não devemos questionar sua obra.
पण तरीही परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. आम्ही मातीप्रमाणे आहोत आणि तू आमचा कुंभार आहेस. आम्ही सर्व तुझ्या हातांचे काम आहो.
कुंभारकामावरून धडा
यिर्मयाला परमेश्वराकडून आलेले वचन ते आहे, ते म्हणाले: "उठ आणि कुंभाराच्या घरी जा, कारण मी तेथे तुला माझी वचने देईन." म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, आणि पाहा! तो कुंभार चाकावर काम करीत होता, पण जे मातीचे पात्र तो तयार करत होता ते त्याच्या हातात असतांनाच बिघडले, म्हणून त्याने आपले विचार बदलले आणि त्याच्या दृष्टीस चांगले वाटणारे त्याचे त्याने पुन्हा एक दुसरे पात्र तयार केले. तेव्हा परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले: परमेश्वर असे म्हणतो, "इस्राएलाच्या घराण्यांनो, तुमच्याबरोबर या कुंभार सारखे वागण्यास मी सक्षम नाही काय? अहो, इस्राएलाच्या घराण्यांनो पाहा! जशी माती कुंभाराच्या हातात असती तसे तुम्ही माझ्या हातात आहात.
पण उलट अरे बंधू, तू जो देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस, अशी कोणती वस्तू करणार्याला म्हणू शकेल? कुंभाराने एकाच गोळ्यामधून एक पात्र मानासाठी तर दुसरे अपमानासाठी करायला मातीवर अधिकार नाही काय?
जो कोणी आपल्या निर्मात्याशी वाद घालतो त्यास हायहाय!
मातीच्या खापरांमध्ये एक खापर असा तो आहे. तू काय करतोस, असे चिखल आपल्या घडणाविऱ्याला म्हणेल काय? किंवा तुला हात नाहीत काय जेव्हा तू हे करतो?
तुम्ही गोष्टींची उलटफेर करता! कुंभार मातीप्रमाणे आहे असे मानतील काय? एखाद्याने तयार केलेली वस्तूच त्या तयार करणाऱ्याला बोलेल काय? "तू मला घडवले नाहीस, आणि त्यास काही समजत नाही" असे घडलेली वस्तू आपल्या घडवणाऱ्याविषयी बोलेल काय?
Vasos para honra
O cristão é chamado a ser um vaso de honra, purificado e preparado para toda boa obra. Nosso valor está em quem nos formou e no que carregamos.
मोठ्या घरात केवळ सोन्याचांदीची भांडी असतात असे नाही तर लाकूड व माती यापासून बनवलेलीही असतात. काही सन्मानास व काही अवमानास नेमलेली असतात. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, मालकाला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल.
प्रेषितांची शक्तीहीनता व देवाचे सामर्थ्य
पण आमचे हे धन आमच्याजवळ मातीच्या भांड्यात आहे, याचा अर्थ हा की, सामर्थ्याची पराकाष्ठा आमची नाही पण देवाची आहे.
सियोनेचे मोलवान पुत्र शुद्ध सोन्याच्या बरोबरीचे होते,
पण आता ते कुंभाराच्या हाताने केलेल्या केवळ मडक्याप्रमाणे मानलेले आहेत.
Moldados pela graça
Mesmo quando nos sentimos frágeis e imperfeitos, o poder de Deus se aperfeiçoa em nossa fraqueza. Ele nos restaura e nos renova continuamente.
तुझ्या हातांनी माझी निर्मिती केली, माझ्या शरीराला आकार दिला, आता तेच हात माझ्याभोवती आवळले जात आहेत आणि माझा नाश करीत आहेत.
मी विनंती करतो, विचार कर जरा आठव तू मला मातीसारखे बनवलेस. आता तूच परत माझी मातीत मिळवणार आहेस का?
जसे वाणी कळवळ्याची आणि दुष्ट हृदय असणे,
हे मातीच्या पात्राला रुप्याचा मुलामा दिल्यासारखे आहे.
मेंढपाळांनो विलाप करा आणि मदतीसाठी रडा. कळपातील धन्यांनो जमिनीवर लोळा.
कारण ही तुला मारल्या जाण्याचा आणि विखरण्याचा दिवस आला आहे. तुम्ही फुटक्या मडक्याच्या तुकड्याप्रमाणे सगळीकडे पडाल.