Vaso
A metáfora do vaso é uma das mais belas da Bíblia. Assim como o oleiro molda o barro, Deus nos forma segundo seus propósitos, fazendo de nós vasos úteis para sua glória.
Nas mãos do oleiro
Deus é o Oleiro e nós somos o barro. Ele tem autoridade e sabedoria para nos moldar conforme sua vontade perfeita, e não devemos questionar sua obra.
परंतु हे याहवेह, तुम्हीच आमचे पिता आहात.
आम्ही माती आहोत, तुम्ही कुंभार आहात;
आम्ही सर्व तुमची हस्तकृती आहोत.
याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले: "कुंभाराच्या घरी जा आणि तिथे मी तुला माझा संदेश देईन." म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, आणि तिथे तो आपल्या चाकावर काम करताना मला दिसला. परंतु तो जे मडके करीत होता, त्याच्या हातातील मातीचा आकार बिघडला; म्हणून त्याने त्याचे, त्याला योग्य वाटेल तसे दुसरे मडके बनविले.
तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले. ते म्हणाले, "हे इस्राएला, या कुंभाराने आपल्या मातीचे केले तसे मला तुझे करता येणार नाही काय? कुंभाराच्या हातात माती असते तसे इस्राएला, तुम्ही माझ्या हातात आहात," असे याहवेह जाहीर करतात.
मानव असून, परमेश्वराला उलट उत्तर देणारे तुम्ही कोण? "घडलेल्या वस्तूने ती घडविणार्याला, ‘तू मला असे का घडविलेस असे म्हणावे काय?’ " कुंभाराला एकाच मातीच्या गोळयातून एक पात्र विशेष उद्देशासाठी व काही सामान्य वापरासाठी घडविण्याचा अधिकार नाही काय?
"जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो, त्याला धिक्कार असो.
जो जमिनीवर पडलेल्या मडक्याच्या अनेक तुकड्यांमधील
केवळ एक मडक्याच्या तुकडा आहे.
माती कुंभाराला म्हणते काय,
‘हे तू काय घडवित आहेस?’
तुझी हस्तकृती तुला म्हणते काय,
‘कुंभाराला तर हातच नाहीत’?
तुम्ही गोष्टी उलटवून टाकता,
जणू कुंभार हा मातीसारखा असेल!
ज्याला आकार दिला, तो आकार देणाऱ्याला असे म्हणेल का,
"तू माझी रचना केली नाहीस?"
मडके कुंभाराला म्हणू शकते का,
"तुला काहीच माहीत नाही?"
Vasos para honra
O cristão é chamado a ser um vaso de honra, purificado e preparado para toda boa obra. Nosso valor está em quem nos formou e no que carregamos.
मोठ्या घरात सोन्याचांदीची, तशीच काही लाकडाची व मातीची बनविलेली पात्रे असतात. काही विशेष उद्देशासाठी व काही सामान्य वापरासाठी आहेत. म्हणूनच, जो स्वतःला त्यापासून दूर राहून शुद्ध करतो, तो सन्मानास नेमलेले, पवित्र, स्वामीसाठी उपयुक्त आणि प्रत्येक चांगल्या कार्यासाठी तयार केलेले पात्र मानला जाईल.
तरी आम्हासाठी हा मोलवान ठेवा एका मातीच्या पात्रात ठेवलेला आहे हे दाखविण्यासाठी की, जे अपार सामर्थ्य आमचे स्वतःचे नसून परमेश्वराकडून आहे, हे प्रत्येकाला दिसावे.
सुवर्णतुल्य असलेल्या,
सीयोनाच्या लेकरांना,
आता कुंभाराच्या हातांनी
घडविलेल्या मातीच्या पात्रांप्रमाणे लेखले जात आहे!
Moldados pela graça
Mesmo quando nos sentimos frágeis e imperfeitos, o poder de Deus se aperfeiçoa em nossa fraqueza. Ele nos restaura e nos renova continuamente.
"तुमच्या हातांनी मला घडवून निर्माण केले आहे.
आणि तुम्हीच फिरून मला नष्ट करणार आहात काय?
तुम्ही मला मातीच्या कलशाप्रमाणे घडविले याचे स्मरण करा,
पुन्हा तुम्हीच मला धुळीत मिळविणार काय?
गोड शब्द उच्चारणाऱ्या दुष्टाचे अंतःकरण
चांदीचा मुलामा दिलेल्या मातीच्या पात्रासारखे आहे.
अहो मेंढपाळांनो, दुःखाने रडा आणि विलाप करा;
मानवजातीच्या कळपांच्या पुढार्यांनो, धुळीत लोळा.
कारण तुमचा वध होण्याची वेळ आता आली आहे;
मातीच्या उत्तम भांड्यासारखे तुम्ही सर्व कोसळून पडाल.