Verdade
A verdade é um dos atributos centrais de Deus e um pilar da vida cristã. Jesus se declarou o caminho, a verdade e a vida. Viver na verdade é viver em liberdade e integridade.
Deus é a fonte da verdade
O Senhor é fiel e verdadeiro em todas as suas palavras. Sua Palavra é a verdade absoluta que ilumina nosso caminho e nos sustenta.
येशूने त्यास म्हटले, "मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते.
कारण परमेश्वरचे वचन सरळ आहे,
आणि तो जे करतो ते प्रामाणिकपणाने करतो.
देवाचा प्रत्येक शब्द पारखलेला आहे,
जे त्याच्या आश्रयास येतात त्यांची तो ढाल आहे.
पण आम्हास माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हास समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्यास आम्ही ओळखावे आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.
O Espírito da verdade
Jesus prometeu enviar o Espírito Santo, o Espírito da verdade, que nos guia, ensina e nos faz lembrar de tudo o que Cristo disse.
तरीही मी तुम्हास खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या फायद्याचे आहे, कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर मी त्यास तुमच्याकडे पाठवीन;
पण जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.
पण तुम्हाविषयी म्हणावयाचे तर, त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हास कोणी शिकविण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही तुम्हास सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हास शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यामध्ये राहा.
देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे."
A verdade liberta
Jesus prometeu que conhecer a verdade nos torna livres. A mentira aprisiona, mas a verdade de Deus nos conduz à plenitude.
ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, "तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करील."
मी विश्वासाचा मार्ग निवडला आहे;
मी तुझे योग्य निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत.
तू आपल्या सत्यात मला मार्ग दाखव आणि मला शिकव.
कारण तू माझा तारणारा देव आहेस
मी रोज तुझी वाट पाहतो.
तू सत्याचे वचन योग्य रीतीने सांगणारा असा आणि जे काम करतोस त्यामध्ये लाज वाटण्यासारखे काहीही कारण नसलेला देवास स्वीकृत असा कामकरी होण्याचा प्रयत्न कर.
आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला जन्म दिला.
Vivendo e falando a verdade
Somos chamados a falar a verdade em amor e a rejeitar toda forma de engano. A integridade nas palavras é marca do cristão.
त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने त्याच्यामध्ये वाढावे जो आमचा मस्तक आहे, ख्रिस्त
बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा.
जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो.
जो आपल्या जीभेने चुगली करत नाही,
किंवा दुसऱ्यांची हानी करत नाही,
किंवा आपल्या शेजाऱ्याचा अपमान करत नाही.
तर वाईट बोलण्यापासून आवर,
आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर.
नीतिमानाला जे काही स्वीकारणीय ते त्यांच्या ओठास कळते,
पण दुष्टाच्या मुखास, जे कुटिल बोलणे आहे ते समजते.
वाकडे बोलणे तुझ्यापासून दूर ठेव,
आणि दूषित बोलणे सोडून दे.
माझ्या बंधूंनो, मुख्यतः शपथ वाहू नका; स्वर्गाची, पृथ्वीची किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हास होय म्हणायचे तर होयच म्हणा. तुम्हास नाही म्हणायचे तर नाहीच म्हणा.
प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जीभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी.
जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही जगतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व सत्याला अनुसरत नाही.
माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेही होत नाही.
विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे.