Vida
A vida é um dom precioso de Deus. Desde a concepção até a eternidade, as Escrituras revelam o propósito, o valor e a plenitude da vida que o Senhor nos oferece.
Deus, o autor da vida
O Senhor é quem dá a vida e a sustenta. Cada ser humano foi formado por suas mãos com propósito e intenção divina.
परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला.
तू माझे अंतर्याम निर्माण केलेस;
तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले.
मी तुला धन्यवाद देतो,
कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत,
हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो.
मी गुप्तस्थळी निर्माण होत असता,
आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे
माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती.
तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस;
माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी
ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते.
कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे.
तुझ्या प्रकाशात आम्ही प्रकाश पाहू.
मी माझ्या आयुष्यभर परमेश्वरास गाणे गाईन.
जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे मी गुणगान करीन.
A vida em Cristo
Jesus é o caminho, a verdade e a vida. Nele encontramos sentido, plenitude e a promessa de vida abundante e eterna.
येशूने त्यास म्हटले, "मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
चोर तर, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.
येशूने तिला म्हटले, "पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असला तरी जगेल. आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, यावर तू विश्वास ठेवतेस काय?"
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, "मीच जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्यास कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास कधीही तहान लागणार नाही.
जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील."
मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्याद्वारे आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.
मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्याद्वारे आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.
Vivendo com sabedoria
A Bíblia nos orienta a viver com sabedoria, aproveitando bem o tempo, guardando o coração e buscando a vontade de Deus para cada dia.
म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे
मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.
माझ्या मुला, ऐक आणि माझ्या वचनाकडे लक्ष दे,
आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील.
तुझे अंतःकरण सुरक्षित ठेव आणि सर्व दक्षतेने त्याचे संरक्षण कर,
कारण त्यातूनच जीवनाचा झरा वाहतो.
तुझे अंतःकरण सुरक्षित ठेव आणि सर्व दक्षतेने त्याचे संरक्षण कर,
कारण त्यातूनच जीवनाचा झरा वाहतो.
जो कोणी ज्ञान मिळवतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो,
जो कोणी सुज्ञता सांभाळतो त्यास जे काही चांगले आहे ते मिळेल.
जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो,
परंतु जो आपले तोंड उघडतो तो स्वतःचा नाश करून घेतो.
जो कोणी शिस्तीचे अनुसरण करतो तो जीवनाच्या मार्गात आहे,
पण जो दोषारोपाला नकार देतो तो चुकीच्या मार्गाने जातो.
परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे,
याकरिता त्यांनी मरणाच्या जाळ्यापासून दूर रहावे.
जो कोणी नीतिमत्ता आणि दया करतो,
त्यास आयुष्य, उन्नती आणि मान मिळेल.
म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी काळजीपूर्वक असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा. वेळेचा चांगला उपयोग करा कारण ज्या दिवसात तुम्ही राहत आहात ते वाईट आहेत.
A vida no dia a dia
Cada dia é uma oportunidade de glorificar a Deus. A Escritura nos chama a viver com propósito, confiança e fé prática.
हे परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव,
मला तुझे मार्ग शिकव.
खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील,
आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.
माझा देह आणि माझे हृदय दुर्बल होत आहेत,
पण देव सर्वकाळ माझ्या हृदयाचे सामर्थ्य आहे.
परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील;
तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.
परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील,
त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील.
कारण तू माझा खडक आणि माझा दुर्ग आहेस,
तर तुझ्या नामास्तव मला मार्गदर्शन कर आणि मला चालव.
मी परमेश्वरास एक गोष्ट मागितली, तीच मी शोधीन,
परमेश्वराची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात
ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस घालवेन,
परमेश्वराच्या घरात मी वस्ती करीन.
परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा.
जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो,
तर काळजी करू नको.
मी तुझे निर्बंध कधीच विसरणार नाही,
कारण त्याद्वारे तू मला सजीव ठेवले आहे.
Prioridades e eternidade
Jesus nos lembra que a vida é mais que comida e o corpo mais que roupa. O que importa é buscar o Reino de Deus e viver para a eternidade.
म्हणून मी तुम्हास सांगतो की, तुम्ही आपल्या जीवनाविषयी काळजी करु नका की आपण काय खावे आणि काय प्यावे किंवा आपल्या शरीराविषयी आपण काय पांघरावे अशी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा आणि शरीर वस्त्रांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे की नाही? आकाशातील पक्ष्यांकडे पाहा! ती पेरीत नाहीत, कापणी करीत नाहीत किंवा कोठारात साठवूनही ठेवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात की नाही?
आणि चिंता करून आपले आयुष्याची लांबी हाथभरही वाढवणे तुम्हापैकी कोणाला शक्य आहे का?
मनुष्याने सर्व जग मिळविले व आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ?
नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांस बोलावले व त्यांना म्हणाला, "जर कोणाला माझ्यामागे यायचे असेल तर त्याने स्वतःला नाकारावे. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. मनुष्याने सर्व जग मिळविले व आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ? जीवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल? देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील."
मग येशू त्यांना म्हणाला, "सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा कारण जेव्हा एखाद्या मनुष्याजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती त्याचे जीवन होत असे नाही."
सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.
कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे.
आणि या जगाशी समरूप होऊ नका पण तुमच्या मनाच्या नवीनीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी.
कारण आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही;
सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा.
आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे शांतीने राहा. आपआपला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे याची आवड तुम्हास असावी. बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये.
आणि जे काही तुम्ही करता ते मनुष्यांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हास मिळेल तुम्ही हे तुम्हास माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत जा.
जो परीक्षा सोसतो तो धन्य आहे कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्यास मिळेल.
तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी.
कारण, "जो जीविताची आवड धरतो व चांगले दिवस बघावेत अशी इच्छा करतो
त्याने वाईटापासून आपली जीभ कपटी भाषणापासून, आपले ओठ आवरावेत
त्याने वाईट सोडून चांगले करावे,
शांतीचा शोध करून तिला अनुसरावे.
प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो.
परमेश्वराची स्तुती करा.
प्रत्येक गोष्टीला नेमलेला समय असतो आणि आकाशाखाली प्रत्येक कार्याला समय असतो.
तुमच्या परमेश्वर देवावर प्रेम करा, त्याच्या मार्गाने जा व त्याच्या आज्ञा, नियम पाळा अशी माझी तुम्हास आज्ञा आहे. म्हणजे तुम्ही जो प्रदेश आपलासा करायला जात आहात तेथे दीर्घकाळ रहाल, तुमच्या देशाची भरभराट होईल, तुम्हास तुमचा देव परमेश्वर ह्याचे आशीर्वाद मिळतील.
आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तू चिरकाळ राहशील.
आमचे आयुष्य सत्तर वर्षे आहे;
किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे;
पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु:ख यांच्या निशाणीने भरलेले आहे.
होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो.
हे परमेश्वरा, माझ्या जीवनाचा अंत केव्हा आहे,
आणि माझ्या आयुष्याचे दिवस किती आहेत हे मला कळू दे,
मी किती क्षणभंगुर आहे ते मला दाखव.
माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे.
पाहा, तू माझे दिवस हाताच्या रुंदी इतके केले आहेत.
आणि माझा जीवनकाल तुझ्यासमोर काहीच नाही.
खचित मनुष्य केवळ एक श्वासच आहे.
खचित प्रत्येक मनुष्य हा सावलीसारखा चालतो,
खचित प्रत्येकजण संपत्ती साठवण्यासाठी घाई करतो,
पण त्यांना हे कळत नाही कोणास ते प्राप्त होणार.
सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे?
तर वाईट बोलण्यापासून आवर,
आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर.
वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर.
शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग.
पिकलेले केस वैभवाचा मुकुट आहे;
नीतिमत्तेच्या मार्गाने चालण्याने तो प्राप्त होतो.
जसे पाण्यात मनुष्याच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब जशाचे तसे दिसते,
तसेच मनुष्याचे हृदय मनुष्याचे प्रतिबिंब दाखविते.