A volta de Jesus
A volta de Jesus é uma das maiores promessas da Bíblia. Cristo prometeu que retornará em glória, e os cristãos vivem na expectativa desse dia triunfante.
A promessa do retorno
Jesus prometeu aos discípulos que voltaria. Os anjos confirmaram essa promessa na ascensão, e os apóstolos ensinaram que Ele virá com poder.
मना बापना घरमा राहवाले भरपूर जागा शे, नही राहत्यात तर मी तुमले सांगतु, मी तुमनाकरता जाग तयार कराले जाई राहीनु. अनी मी जाईसन तुमनाकरता जाग तयार करी म्हणजे परत ईसन तुमले आपलाजोडे लिसु, यानाकरता की जठे मी शे तठे तुम्हीन बी ऱ्हावाले पाहिजे.
अस सांगावर, तो त्यासना डोयादखत वर लेवाई गया, अनी ढगसनी त्याले त्यासना डोयासना आड करी लिधं.
तो जाई राहिंता तवय त्या आकाशकडे टक लाईसन दखी राहींतात, तवय दखा, पांढरा शुभ्र कपडा घालेल दोन माणसं त्यासनाजोडे उभा राहीनात. तवय त्या बोलनात, अहो गालीलकरसवन, तुम्हीन आकाशकडे काय दखीसन उभा राहिंनात? तुमना मातीन वर स्वर्गमा लेवाई गया तोच येशु, जस तुम्हीन त्याले स्वर्गमा जातांना दखं तसच येतांना दखशात.
ह्या गोष्दीसबद्दल साक्ष देणारा येशु म्हणस, "हो! मी लवकर येस!" आमेन.
ये, प्रभु येशु, ये.
दखा, मी लवकर येस; अनी प्रत्येकले ज्याना त्याना कृत्यसप्रमाणे देवाले मनाजोडे वेतन शे.
Os sinais e o momento
Ninguém sabe o dia nem a hora. Jesus alertou sobre falsos sinais e nos chamou à vigilância constante, pois Ele virá como ladrão na noite.
"त्या दिनबद्दल अनी त्या येळबद्दल कोणलेच माहीत नही, स्वर्ग माधला देवदूतसले नही, देवना पोऱ्यालेसुध्दा नही; फक्त देवबापलेच माहीत शे. नोहाना दिनसनामायक मनुष्यना पोऱ्यानं येणं व्हई. तवय जस जलप्रलय येवाना पहीलेना दिनसमा नोहा जहाजमा जास नही तोपावत लोके खाई पी राहींतात, लगीन करी ली राहींतात, लगीन करी दी राहींतात; तवय जलप्रलय ईसन त्यासले वाहीन लई गया तोपावत त्यासले समजनं नही, तसच मनुष्यना पोऱ्यानं येणं व्हई.
"अजुन त्या दिनबद्दल अनी त्या येळबद्दल कोणलेच माहीत नही, स्वर्गना देवदूतसले नही, देवना पोऱ्यालेसुध्दा नही; फक्त देवबापलेच माहीत शे.
भाऊसवन अनी बहिणीसवन, काळ अनं येळ यानाबद्दल तुमले काही लिखाणी गरज नही. कारण तुमले स्वतःले पक्क माहित शे की, जशा रातले चोर येस, तसाच प्रभुना दिन ई. शांती शे, निर्भय शे अस त्या म्हणतस तवय गरोदर बाईले ज्याप्रमाणे अचानक वेदना व्हतस त्याप्रमाणे त्यासना अचानक नाश ई अनी त्या टिकावुच नहीत.
यामुये, जागृत ऱ्हा, कारण कोणता दिनले तुमना प्रभु ई हाई तुमले माहीत नही. आखो, हाई समजी ल्या की, कोणता येळले चोर येवाव शे हाई जर घरमालकले माहीत ऱ्हातं, तर तो जागा ऱ्हाता अनी आपलं घर चोरले फोडु नही देता. यामुये तुम्हीन तयार ऱ्हा, तुमले वाटाव नही त्या येळले मनुष्यना पोऱ्या ई."
भाऊ अनं बहिणीसवन आपला प्रभु येशु ख्रिस्तनं आगमन अनी त्यानाजोडे आपल एकत्र व्हणं, यानाबद्दल आम्हीन तुमले अशी ईनंती करतस की, कदाचित तुमले आमना पत्रमुये वाटत व्हई की, प्रभुनं येणं जोडे येल शे तर नाराज व्हईसन हिम्मत सोडु नका अनं अस्वस्थ व्हवु नका. कोणता बी प्रकारतीन कोणकडतीन फसु नका; प्रभुविरूध्द शेवटला बंड व्हस नही, प्रभुना दिनना पहिले बंड व्हई, तवय दुष्ट माणुस प्रकट व्हई; ज्याले नरकमा टाकामा ई. तो दुष्ट माणुस, विरोधी अनं ज्याले देवना किंवा ज्या भजनीय गोष्टी शेतस त्या सर्वासपेक्षा स्वतःले उंच करनारा, म्हणजे मी देव शे, अस स्वतःनं प्रदर्शन करीसन देवना मंदिरमा बसणारा असा शे.
A glória da segunda vinda
Cristo voltará nas nuvens, com poder e grande glória. Os mortos em Cristo ressuscitarão, e os vivos serão arrebatados para encontrá-lo nos ares.
कारण, आज्ञाध्वनी आद्यदिव्यदूतसनी वाणी अनं देवना तुतारीना नाद व्हत असतांना प्रभु स्वतः स्वर्गामातीन उतरी; अनी ख्रिस्तमा ज्या मरेल शेतस त्या पहिले ऊठतीन; नंतर जिवत उरेल आपण त्यासनासंगे मेघारूढ व्हईन अंतराळमा लेवाई जासुत, अनी आम्हीन कायम परमेश्वरनासंगे राहसुत.
"हाई संकट ई जावानंतर त्या दिनमा सुर्य अंधकारमय व्हई अनी चंद्र प्रकाश देवाव नही. आकाशमाधला तारा पडतीन अनी आकाशमाधली शक्ती हाली जाई. तवय मनुष्यना पोऱ्याले पराक्रमतीन अनी मोठा वैभवतीन ढगसमा येतांना त्या दखतीन. त्या येळले मी देवदूतसले धाडीन पृथ्वीना एक टोकपाईन दुसरा टोकपावत चारी दिशातीन देवनी निवडेल लोकसले एकत्र करसु."
जवय मनुष्यना पोऱ्या आपला वैभवमा सर्वा देवदूतसंगे ई, तवय मी आपला वैभवी राजासनवर बठसु. मनापुढे सर्वा राष्ट्रे गोळा व्हतीन अनी जशा मेंढपाय बकरीसमातीन मेंढरसले येगळे करस तस तो त्यासले एकमेकसपाईन येगळे करी. तो मेंढरासले आपला उजवी बाजुले अनी बकरीसले डावीबाजुले करी.
नंतर मी स्वर्ग उघडेल अनी तठे एक पांढरा घोडा व्हता. घोडस्वारले ईश्वासु अनी सत्य अस म्हणेत; तो न्यायातीन न्यायनिवाडा करस अनं त्याना युध्द लढस. त्याना डोया आगना ज्वालानामायक शेतस अनं त्याना डोकावर बराच मुकुट शेतस, त्यानावर एक नाव लिखेल शे, ते नाव काय व्हतं त्यानाशिवाय कोणलेच माहीत नही. रंगतमा बुडायेल कपडा त्यानी आंगवर ओढेल व्हतात, अनी "देवना शब्द" हाई त्यानं नाव शे. स्वर्गमाधलं सैन्य पांढरा घोडावर बठीन पांढरा अनं शुध्द असा तागना कपडा घालीन त्यानामांगे चाली राहिंती. त्यानी राष्ट्रासना पराभव कराले पाहिजे म्हणीसन त्याना तोंडमातीन तीक्ष्ण धारनी तलवार निंघस, तो त्यानावर लोखंडी दंडाघाई अधिकार गाजाडी, अनी सर्वसमर्थ देव याना क्रोधरूपी द्राक्षरसनं कुंड तो तोडस. त्याना कपडासवर अनं त्याना मांडीसवर "राजासना राजा अनी प्रभुसना प्रभु" हाई नाव लिखेल शे.
ज्याले कोणले मनी अनी मना वचननी लाज वाटी, त्यानी लाज जवय मनुष्यना पोऱ्या स्वतःना, पिताना अनं पवित्र देवदूतना गौरवमा ई, तवय त्याले बी वाटी.
Vivendo na expectativa
A certeza do retorno de Cristo nos chama a viver em santidade, aguardando novos céus e nova terra onde habita a justiça.
तरी मना प्रिय लोकसवन, हाई एक गोष्ट तुम्हीन ईसराले नको, कारण प्रभुले एक दिन हजार वरीसनामायक, अनी हजार वरीस एक दिननामायक शे. कित्येक लोक ज्याले उशीर म्हणीन म्हणतस तसा उशीर प्रभु आपला वचनबद्दल करस नही, तर तो तुमनं सहन करस; कोणा नाश व्हवाले पाहिजे अशी त्यानी ईच्छा नही, तर सर्वासनी त्यासना पापसपाईन फिराले पाहिजे. पण प्रभुना दिन चोरनामायक ई, त्या दिन आकाशमातील सर्व गोष्टी मोठा नाद करीसन नष्ट व्हतीन, सृष्टीमा जे व्हई ते जळीसन नष्ट व्हई, पृथ्वी अनी तिनावरल्या सर्व गोष्टी गायब व्हतीन.
तर ह्या सर्व गोष्टी नष्ट व्हणारा शेतस म्हणीन पवित्र वागणुकमा अनं सुभक्तीमा राहिन देवना दिन येवानी वाट दखत अनं तो दिन लवकर येवाले पाहिजे म्हणीसन खटपट करत तुम्हीन कसं ऱ्हावाले पाहिजे? परमेश्वरना त्या दिनमुये आकाश जळीसन नष्ट व्हई जाई अनी सृष्टीमा जे व्हई ते तापीसन वितळी. तरी ज्यानामा धार्मीकता वास करस नवं आकाश अनं नवी पृथ्वी यासनी त्याना वचनसप्रमाणे आपण वाट दखी राहिनुत.
जस मनुष्यले एकदावनं मरणं अनी त्यानानंतर देवकडतीन न्याय व्हणं नेमी ठेयल शे. तसा ख्रिस्त बराच जणसना पापं स्वतःवर लेवाकरता एकदावच अर्पण व्हयना अनी तो दुसरींदाव प्रकट व्हई तवय तो पाप लेवाकरता नही, पण त्यासना उध्दारकरता ज्या उत्सुकतातीन त्याना येवानी वाट दखी राहीनात.