A volta de Jesus
A volta de Jesus é uma das maiores promessas da Bíblia. Cristo prometeu que retornará em glória, e os cristãos vivem na expectativa desse dia triunfante.
A promessa do retorno
Jesus prometeu aos discípulos que voltaria. Os anjos confirmaram essa promessa na ascensão, e os apóstolos ensinaram que Ele virá com poder.
माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो आणि, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन; यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.
असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर तो वर घेतला गेला, आणि मेघांनी त्यास दृष्टीआड केले. नंतर तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरूष त्यांच्याजवळ उभे राहिले. आणि ते असे बोलले, "अहो गालीलकारांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले आहात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे? तुम्ही त्यास जसे आकाशात जातांना पाहता तसाच तो परत येईल."
जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो, तो म्हणतो, "होय, मी लवकर येतो." आमेन, ये प्रभू येशू, ये.
"पाहा, मी लवकर येत आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे,
Os sinais e o momento
Ninguém sabe o dia nem a hora. Jesus alertou sobre falsos sinais e nos chamou à vigilância constante, pois Ele virá como ladrão na noite.
पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणीही काही जाणत नाही. स्वर्गातील देवदूतही जाणत नाही किंवा स्वतः पुत्रही जाणत नाही. नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल. तेव्हा जसे महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते, लोक लग्न करीत होते, लग्न करून देत होते. नोहा तारवात जाईपर्यंत लोक या गोष्टी करीत होते. आणि महापूर येऊन त्यांना घेऊन गेला तोपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.
त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांनाही नाही व पुत्रासही नाही. फक्त पित्याला ठाऊक आहे.
बंधूनो, काळ व समय ह्यांविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही. कारण तुम्हा स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो. "शांती आहे, सुरक्षितता आहे" असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरु होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होईल आणि ते निभावणारच नाहीत.
म्हणून तुम्ही जागृत असा, कारण तुम्हास माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे, हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते. या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हास अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.
बंधूनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे येणे व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्यासंबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की, तुम्ही एकदम दचकून भांबावून जाऊ नका व घाबरू नका; प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका; कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरूष, नाशाचा पुत्र प्रकट होईल; तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा उपासनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या भवनात बसणारा असा आहे.
A glória da segunda vinda
Cristo voltará nas nuvens, com poder e grande glória. Os mortos em Cristo ressuscitarão, e os vivos serão arrebatados para encontrá-lo nos ares.
कारण आज्ञा करणाऱ्या गर्जणेने, आद्यदेवदूतांची वाणी आणि देवाच्या कर्ण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मरण पावलेले प्रथम उठतील. मग आपण जे जिवंत आहोत व मागे राहू, ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी ढगात उचलले जाऊ आणि सर्वकाळ प्रभूबरोबर राहू.
परंतु त्या दिवसात ही संकटे येऊन गेल्यावर,
‘सूर्य अंधकारमय होईल,
चंद्र प्रकाश देणार नाही.’
‘आकाशातून तारे पडतील
आणि आकाशातील बळे डळमळतील.’
आणि लोक मनुष्याचा पुत्राला मेघांरूढ होऊन मोठ्या सामर्थ्यानिशी आणि वैभवाने येताना पाहतील. नंतर तो आपल्या देवदूतास पाठवील व चार दिशातून, पृथ्वीच्या सीमेपासून ते आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांस एकत्र करील.
मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजासनावर बसेल. मग सर्वं राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो. तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील.
तेव्हा मी बघितले की, स्वर्ग उघडला आणि पाहा, एक पांढरा घोडा आणि त्यावर जो बसला होता त्याचे नाव विश्वासू आणि खरा आहे, तो नीतीने न्याय करतो, आणि युद्ध करतो, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते आणि त्याचे एक नाव लिहिलेले होते; ते त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही. त्याने एक, रक्तात भिजवीलेला झगा घातला होता; आणि देवाचा शब्द हे नाव त्यास देण्यात आले आहे; आणि स्वर्गातल्या सेना पांढऱ्या घोड्यांवर बसून शुभ्र, स्वच्छ, तलम तागाची वस्त्रे परिधान करून त्याच्या मागोमाग जात होत्या. आणि त्याने राष्ट्रांवर प्रहार करावा म्हणून त्याच्या तोंडामधून एक धारदार तलवार निघते, तो त्यांच्यावर लोहदंडाने सत्ता चालवील; तो सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाचे द्राक्षकुंड तुडवील. त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असे नाव लिहिलेले आहे.
जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयीची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील.
Vivendo na expectativa
A certeza do retorno de Cristo nos chama a viver em santidade, aguardando novos céus e nova terra onde habita a justiça.
पण प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नये की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसमान आणि हजार वर्षे एका दिवसासमान आहेत. कित्येक लोक ज्याला उशीर म्हणतात तसा उशीर प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तर तो तुमच्याविषयी फार सहनशील आहे. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.
तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्यादिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तापून विरघळतील आणि पृथ्वी तिच्यावरील कामे जळून जातील.
या सर्व गोष्टी जर लयास जाणार आहेत म्हणून तुम्ही पवित्र आचरणात व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? देवाच्या त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे अत्यंत तापून वितळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व राहते, असे नवे आकाश व नवे पृथ्वी त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.
ज्याअर्थी लोकांस एकदाच मरणे व नंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, तसाच ख्रिस्त हि, पुष्कळांची पापे वाहून नेण्यास एकदाच अर्पिला गेला आणि त्याची वाट पाहणाऱ्यांस पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी दुसऱ्याने दिसेल.