Viúvas
A Bíblia revela um cuidado especial de Deus pelas viúvas. Ao longo das Escrituras, encontramos mandamentos claros de proteção, justiça e compaixão, refletindo o caráter amoroso do Senhor.
A proteção divina
Deus se apresenta como defensor das viúvas, garantindo que não fiquem desamparadas. Ele acolhe os que sofrem e sustenta os que perderam seu amparo terreno.
परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या नावाचे स्तवन करा,
जे मेघांवर स्वार होतात, त्यांची महिमा करा;
त्यांचे नाव याहवेह आहे—त्यांच्या समक्षतेत हर्ष करा.
परमेश्वर पितृहीनांचे पिता आणि विधवांचे न्यायदाता आहेत,
ते आपल्या पवित्र निवासस्थानी आहेत.
याहवेह निर्वासितांचे रक्षण करतात,
आणि अनाथ व विधवा यांची काळजी घेतात,
परंतु दुष्टांच्या योजना ते नष्ट करतात.
कारण जे गरीब मदतीसाठी याचना करीत आणि ज्या अनाथांच्या मदतीला कोणी नसे,
त्यांची मी सुटका केली.
मरत असलेला व्यक्ती मला आशीर्वाद देत असे;
आणि विधवांचे हृदय मी आनंदित केले.
Justiça e compaixão
A Palavra ordena que seu povo pratique a justiça, protegendo os mais frágeis e defendendo a causa dos necessitados.
गोरगरीब आणि गरजवंत यांचा कैवार घे;
त्यांच्यासाठी बोल आणि त्यांना निष्पक्ष न्याय मिळवून दे.
"सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘निष्पक्ष न्यायदान करा; एकमेकांशी करुणेने व दयेने वागा. विधवा व अनाथ, परदेशीय व गरीब लोक यांच्यावर जुलूम करू नका. तसेच एकमेकांविरुद्ध दुष्ट कट रचू नका.’
"विधवा किंवा अनाथाचा गैरफायदा घेऊ नये. तुम्ही जर तसे केले आणि त्यांनी माझा धावा केला, तर मी खचितच त्यांचे रडणे ऐकेन. मग माझा क्रोध पेटेल आणि मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन; आणि तुमची पत्नी विधवा व तुमची लेकरे अनाथ होतील.
योग्य तेच करण्यास शिका; न्यायीपणाचा शोध घ्या.
पीडितांचे संरक्षण करा.
पितृहीनांच्या बाजूचे समर्थन करा;
विधवांची बाजू मांडा.
O chamado da Igreja
No Novo Testamento, o cuidado com as viúvas é expressão genuína da fé cristã. Tiago declara que a religião pura inclui visitar os necessitados.
परमेश्वर पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्दोष भक्ती हीच आहे की अनाथ व विधवांची त्यांच्या दुःखात काळजी घेणे आणि जगाच्या मलिनतेपासून स्वतःला अलिप्त राखणे.
ज्या गरजवंत विधवा आहेत, त्यांचा सन्मान कर.