नवी आज्ञा
7 २:७ योहान १३:३४ मना प्रिय लोकसवन, मी तुमनाकरता नवी आज्ञा लिखस नही; तर जी आज्ञा सुरवात पाईन तुमले देवामा येल शे तिच जुनी आज्ञा लिखस; जे वचन तुम्हीन ऐकं तीच ती जुनी आज्ञा शे. 8 मी तुमले एक प्रकारे नवी आज्ञा लिखस. ती ख्रिस्तमा अनं तुमनाबाबतमा खरच तसच शे; कारण अंधार आते नष्ट व्हई ऱ्हायना, अनं खरा प्रकाश आते चमकाले लागेल शे.