देवना संतान
1 ३:१ योहान १:१२ आपले देवना पोऱ्या हाई नाव मिळेल शे ह्यामा पिता आपलावर कितलं प्रेम करस हाई दखा; अनी आपण तसाच शेतस. यामुये जग आपले वळखत नही, कारण त्यासनी देवले वळखच नही. 2 मना प्रिय लोकसवन, आते आपण देवना पोऱ्या शेतस; अनी पुढं आपण काय व्हसुत हाई अजुन प्रकट व्हयेल नही; तरी तो प्रकट व्हई तवय आपण त्यानामायक व्हसुत हाई आपले माहित शे, कारण जसं ख्रिस्त शे तसाच तो आपले दखाई.