16 देवनी आपलावर जी प्रिती शे ती आपले समजी जायेल शे अनं आपण तिनावर ईश्वास ठेयल शे. देव प्रिती शे; जो प्रितीमा ऱ्हास तो देवमा ऱ्हास अनं देव त्यानामा ऱ्हास.
17 न्यायना दिनना बाबत आपलामा हिम्मत ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन त्यानी प्रिती आपलामा असा प्रकारमा पुर्ण व्हस; कारण जसं ख्रिस्त शे तसाच आपण बी हाई जगमा शेतस.
18 प्रितीनाठायी भय ऱ्हास नही; एवढंच नही तर पुर्ण प्रिती भयले काढी टाकस; भयमा शिक्षा ऱ्हास अनी भय धरणारा प्रितीमा पुर्ण व्हयेल नही.