2 यानाकरता की तुम्हीन उरेल शारिरीक जिवन मनुष्यना वासनांप्रमाणे नही तर देवना ईच्छाप्रमाणे जगानं. 3 कारण गैरयहूदीसनी ईच्छातीन काम करनं अनी असभ्यता, वासनासनी अभिलाषा, रंगेलपणा, दारूड्या अनं अमंगळ मुर्तिपुजा यामा ऱ्हावामा जो काळ गया तितला पुरा शे; 4 तुम्हीन त्यासना ह्या जंगलीपणमा सहभागी व्हतस नही यानं त्यासले नवल वाटस अनी त्या तुमनी निंदा करतस. 5 जो जिवतसना अनी मरेलसना न्यायनिवाडा कराले तयार शे त्या देवले त्या हिशोब देतीन. 6 सुवार्ता मरेलसले बी सांगेल व्हती, यानंकरता की, मनुष्यनमायक त्यासना शरिरसंबंधतीन न्यायनीवाडा व्हवाले पाहिजे, पण त्यासनी आत्माप्रमाणे देवसंगे जगाले पाहिजे.
देवना दानसना चांगला कारभारी
7 आते सर्वासना शेवट येल शे; यामुये मर्यादामा रहा, अनं प्रार्थना कराकरता तयार रहा;