2 ५:२ योहान २१:१५-१७तुमनामाधला देवना कळपनं पालन करा; करनं पडस म्हणीन नही, तर देवना ईच्छाप्रमाणे आनंदतीन त्यानी देखरेख कर; द्रव्यलोभतीन नही तर उत्सुकतातीन करा; 3 ज्या लोके तुमले सोपेल शेतस, त्यासनावर अधिकार चालाडू नका, पण तुमना गटकरता आदर्श बना. 4 मंग मुख्य मेंढपाय प्रकट व्हई तवय तुमले गौरवना मुकूट भेटी ज्यानी चमक कधीच जास नही. 5 तसच तरूणसवनं, वडीलसना अधीन रहा, अनी एकमेकसनी सेवा कराकरता तुम्हीन सर्वजण नम्रपणाना कमरबंद बांधा; कारण "देव गर्विष्ठसना विरोध करस, अनी नम्र लोकसवर कृपा करस."