खोटा शिक्षणबद्दल इशारा
3 मी मासेदोनिया जाई राहींतु तवय तुले इफिसमा ऱ्हावानी ईनंती करी, त्या येळले तु काही लोकसले ताकिद देवाले पाहिजे की, खोटं शिक्षण देवानं बंद करा, 4 अनी त्यासले अस सांग, जी देवनी व्यवस्था ईश्वासनाद्वारा शे, तिना उपयोगमा नही पडणारा, पण वाद उत्पन्न करनारा गोष्टिसकडे अनी अनंत वंशावळसकडे ध्यान देऊ नका.