चुका करनारासले क्षमा
5 कोणी दुःख देयल व्हई तर त्यानी ते मालेच नही, तर थोडफार तुमले सर्वासले बी देयल शे. मी हाई बोलानं कारण माले त्यानाबद्दल कडक व्हवानी ईच्छा नही शे. 6 असा माणुसले बहुमततीन जी शिक्षा दिधी तीच त्याले पुरी शे. 7 त्या माणुसनी आपला दुःखमा बुडीन ऱ्हावाले नको म्हणीसन, उलट तुम्हीन त्याले माफ करीसन त्याले दिलासा देवाना, हाई चांगलं शे. 8 यामुये मी तुमले ईनंती करस की, तुम्हीन त्यानावर प्रिती करतस हाई त्याले दखाडा.