ख्रिस्तद्वारा देवसंगे मैत्री
11 आम्हीन प्रभुनं मानीसन लोकसले समजुत घालतस; देवले तर आम्हीन प्रकट शेतस; अनी तुमना मनमा बी प्रकट शेतस, अशी आशा आम्हीन धरतस. 12 आम्हीन तुमना जोडे परत आमनी वाहवाह करतस नही, तर तुमले आमनाबद्दल अभिमान करानी येळ येवाले पाहिजेल म्हणीसन अस बोलतस; यानाकरता की जो मनमा नही तर तोंडवर अभिमान बाळगस त्याले तुमले उत्तर देता येवाले पाहिजे. 13 आम्हीन येडा व्हयनुत तर ते देवनाकरता, अनी आम्हीन शुध्दीवर राहीनुत तर ते तुमनाकरता शेतस. 14 ख्रिस्तनं प्रेम आमले आवरी धरस, आम्हीन अस समजतस की एक सर्वाकरता मरना, तर सर्व मरनात. 15 अनी तो सर्वाकरता याकरता मरणा की ज्या जगतस त्यासनी यानापुढे स्वतःकरता नहीतर त्यानाकरता जो मरना अनी परत ऊठना त्यानाकरता जगानं.
16 आत्तेपाईन आम्हीन कोणले मनुष्यना समजनुसार वळखतस नही; अनी जरी आम्हीन ख्रिस्तले मनुष्यना समजनुसार वळखेल व्हतं तरी आते त्याले यानापुढे तसं वळखतस नही. 17 जर कोणी ख्रिस्तमा शे तर तो नवी उत्पत्ति शे; जुनं ते व्हई गयं; दखा, ते नवं व्हयेल शे. 18 हाई सर्व देवपाईन शे; त्यानी तुमले आमले जोडानं काम ख्रिस्तनाद्वारा करं, अनी एकमेकसले जोडानी सेवा आमले दिधी. 19 म्हणजे जगमातील लोकसना पापे त्यासनाकडे नही मोजता, देव ख्रिस्तमा आपलासंगे जगले जोडी राहिंता; अनी त्यानी आमनाकडे लोकसले जोडानं वचन सोपी दिधं.
20 यामुये देव आमना कडतीन बोध करी लेवानामायक आम्हीन ख्रिस्तना बाजुतीन वकिली करतस; देवनासंगे जोडेल तुम्हीन व्हवाले पाहिजे, अशी मनी ख्रिस्तना कडतीन ईनंती करस. 21 ज्याले पाप माहित नव्हतं, त्याले त्यानी तुमना आमनाकरता पाप अस कर; यानाकरता की आपण देवना नितीमान व्हवाले पाहिजेल.