17 जर कोणी ख्रिस्तमा शे तर तो नवी उत्पत्ति शे; जुनं ते व्हई गयं; दखा, ते नवं व्हयेल शे. 18 हाई सर्व देवपाईन शे; त्यानी तुमले आमले जोडानं काम ख्रिस्तनाद्वारा करं, अनी एकमेकसले जोडानी सेवा आमले दिधी. 19 म्हणजे जगमातील लोकसना पापे त्यासनाकडे नही मोजता, देव ख्रिस्तमा आपलासंगे जगले जोडी राहिंता; अनी त्यानी आमनाकडे लोकसले जोडानं वचन सोपी दिधं.
20 यामुये देव आमना कडतीन बोध करी लेवानामायक आम्हीन ख्रिस्तना बाजुतीन वकिली करतस; देवनासंगे जोडेल तुम्हीन व्हवाले पाहिजे, अशी मनी ख्रिस्तना कडतीन ईनंती करस. 21 ज्याले पाप माहित नव्हतं, त्याले त्यानी तुमना आमनाकरता पाप अस कर; यानाकरता की आपण देवना नितीमान व्हवाले पाहिजेल.