जिवत परमेश्वनं मंदिर
14 तुम्हीन अईश्वासीससंगे जाईन त्यासनामा मिसळी जावु नका, कारण धर्म अनी अधर्म यासनी भागीदारी कशी व्हई? उजेड अनी अंधार या कशा एकत्र व्हतीन? 15 ख्रिस्तनं सैतानसंगे कसं एकमत व्हई? ईश्वास ठेवणार अनी ईश्वास नही ठेवणार ह्या कशा काय जोडीदार व्हतीन.