10 यामुये भाऊ अनं बहिणीसवन, तुमले व्हयेल पाचारण अनं तुमनी निवडणुक यानंबद्दल खात्री करीसन लेवाबद्दल विशेष प्रयत्न करा, अस तुम्हीन करं तर तुमना ईश्वास कधीच कमी व्हवाऊ नही. 11 अनी तसा प्रकारे आपला प्रभु तारणारा येशु ख्रिस्त याना सार्वकालिक राज्यमा प्रशस्तपणे तुमना प्रवेश व्हई.