17 तरी प्रिय लोकसवन, या गोष्टी तुमले पहिला पाईन समजी राहीनात, म्हणीसन तुम्हीन अनितीमान लोकसना भटकायेल गोष्टीसमा सापडीन आपला स्थिरतामातीन ढळी जावाले नको यानाकरता जपीसन ऱ्हावा. 18 अनी आपला प्रभु अनं तारणारा येशु ख्रिस्त याना कृपामा अनं ज्ञानमा वाढतच ऱ्हावा. त्याले आते अनं अनंतकाळपावत गौरव असो! आमेन.