8 तरी मना प्रिय लोकसवन, हाई एक गोष्ट तुम्हीन ईसराले नको, कारण प्रभुले एक दिन हजार वरीसनामायक, अनी हजार वरीस एक दिननामायक शे. 9 कित्येक लोक ज्याले उशीर म्हणीन म्हणतस तसा उशीर प्रभु आपला वचनबद्दल करस नही, तर तो तुमनं सहन करस; कोणा नाश व्हवाले पाहिजे अशी त्यानी ईच्छा नही, तर सर्वासनी त्यासना पापसपाईन फिराले पाहिजे. 10 ३:१० मत्तय २४:४३; लूक १२:३९; १ थेस्सलनी ५:२; प्रकटीकरण १६:१५पण प्रभुना दिन चोरनामायक ई, त्या दिन आकाशमातील सर्व गोष्टी मोठा नाद करीसन नष्ट व्हतीन, सृष्टीमा जे व्हई ते जळीसन नष्ट व्हई, पृथ्वी अनी तिनावरल्या सर्व गोष्टी गायब व्हतीन.