धन्यवाद अनी प्रोत्साहन
3 ज्या देवनी मना पुर्वजसंपाईन चालत येल सेवा, मी शुध्द विवेक भावतिन करस त्याना मी उपकार मानस, मी मनी प्रार्थनामा रातदिन तुनी आठवण करस. 4 अनी तुना अश्रु मनमा लईसन तुले भेटानी भलतीच ईच्छा बाळगस, तुनामा जे निष्कपट ईश्वासनी माले आठवण व्हईसन तुले भेटिसन आनंदीत व्हवाले पाहिजे. 5 १:५ प्रेषित १६:१तो ईश्वास पहिलींदाव तुनी आजी लुईस इनामा व्हता, तुनी माय युनीके इनामा व्हता, अनी तोच ईश्वास तुनामा शे अशी माले खात्री शे.