शेवटला दिन
1 हाई समजी ले, शेवटला काळमा कठीण दिन येतीन, 2 कारण माणुस स्वार्थी, पैसासना लोभ धरनारा, बडाईखोर, गर्विष्ट, निंदा करनारा, माय बापले नही माननारा, उपकारसले नही जाणनारा, अपवित्र, 3 ममताहिन, क्षमा नही करनारा, चुगलखोर, असंयमी, क्रुर, चांगलास बद्दल प्रेम नही करनारा 4 ईश्वासघात करनारा, गर्वतिन फुगेल, देववर प्रेम करापेक्षा सुखविलासनी आवड करनारा 5 सुभक्तीनं बाहेरनं रूप दखाडीसन तिना स्वतःवर संस्कार नही असा लोकसपाईन बी दुर रहा.