14 तु तर ज्या सत्य गोष्टी शिकनास अनी ज्याबद्दल तुनी खात्री व्हयेल शे. ते धरीन ऱ्हाय अनी ते कोणापाईन शिकना 15 अनी धाकलपण पाईन तुले पवित्र शास्त्रनी माहीती शे, हाई माले माहित शे. ते ख्रिस्त येशु मातला ईश्वासनाद्वारा तुले तारणकरता ज्ञानी कराकरता समर्थ शे.