बर्णबा अनी शौलनी निवड
1 अंत्युखियानी मंडळीमा काही संदेष्टा अनी शिक्षक व्हतात; जसं की, बर्णबा, शिमोन ज्याले नीगेर13:1 नीगेर म्हणजे काळा म्हणेत, लूक्य कुरेनेकर, शौल अनी मनाएल ज्यानं पालन पोषण मांडलिक हेरोद राजासंगे व्हयेल व्हतं. 2 त्या प्रभुनी सेवा अनं उपास करी राहींतात तवय पवित्र आत्मानी सांगं की, "बर्णबा अनी शौल यासले ज्या कामकरता मी बलायेल शे, त्याकरता त्यासले अलग करा."
3 उपास प्रार्थना व्हयनी तवय त्यासनी त्यासनावर हात ठिसन त्यासले धाडी दिधं.