10 असा त्याले दृष्टांत व्हवानंतर त्या लोकसले शुभवर्तमान सांगाले देवनी आपले बलायेल शे असा अंदाज करीसन आम्हीन मासेदोनिया प्रदेशले जावाना लगेच ईचार करा.
पौल मासेदोनियामधला फिलीप्पै शहरले जास
11 तवय त्रोवासा गावतीन नावमा बठीन आम्हीन निट वाट धरीन समथ्राके गावले गवुत अनी दुसरा दिन नियापुलीस गावले गवुत. 12 तठेन फिलीप्पैले गवुत, ते मासेदोनिया पहिला प्रदेशनं शहर व्हतं, तठे रोमी लोकसनी वस्ती व्हती; त्या शहरमा आम्हीन काही दिनपावत राहीनुत. 13 मंग शब्बाथ दिनले आम्हीन शहरना वेशीबाहेरनी नदीकाठले, जठे प्रार्थना व्हस अस आमले वाटनं तठे जाईन बठनुत अनी ज्या बाया तठे जमेल व्हत्यात त्या त्यासनासंगे बोलु लागणात. 14 तवय थुवतीरा शहरनी लुदिया नावनी कोणी एक बाई जांभळा कपडा ईकनारी देशभक्तीन व्हती, तिनी आमनं भाषण ऐकं; तिना अंतःकरण देवनी अस प्रफुल्लीत करा की पौलना बोलनाकडे तिनी निट लक्ष दिधं. 15 मंग लुदियाना आपला कुटुंबसंगे बाप्तिस्मा व्हवानंतर तिनी अशी ईनंती करी की, "मी प्रभुवर ईश्वास ठेवणारी शे अस जर तुम्हीन ठरायेल शे तर मना घर ईसन राहा." हाई ईनंती तिनी आग्रह करीसन आमनाकडतीन मान्य करी लिधी.
पौल अनी सीला कैदखानामा
16 मंग अस व्हयनं की, एक दिन आम्हीन प्रार्थना स्थळकडे जाई राहींतुत तवय दुष्ट आत्मा आंगमा व्हतात अशी एक दासी जी जवान पोर आमले दखायनी; ती दैवीप्रश्न सांगीन तिना मालकले बराच पैसा कमाडीन देत ऱ्हाये. 17 ती पौलना अनी आमनामांगे ईसन जोरमा बोलनी, "ह्या माणसे परात्पर देवना दास शेतस! ह्या तुमले तारणना मार्ग सांगतस!"