14 तवय थुवतीरा शहरनी लुदिया नावनी कोणी एक बाई जांभळा कपडा ईकनारी देशभक्तीन व्हती, तिनी आमनं भाषण ऐकं; तिना अंतःकरण देवनी अस प्रफुल्लीत करा की पौलना बोलनाकडे तिनी निट लक्ष दिधं. 15 मंग लुदियाना आपला कुटुंबसंगे बाप्तिस्मा व्हवानंतर तिनी अशी ईनंती करी की, "मी प्रभुवर ईश्वास ठेवणारी शे अस जर तुम्हीन ठरायेल शे तर मना घर ईसन राहा." हाई ईनंती तिनी आग्रह करीसन आमनाकडतीन मान्य करी लिधी.