पौल अनी सीला कैदखानामा
16 मंग अस व्हयनं की, एक दिन आम्हीन प्रार्थना स्थळकडे जाई राहींतुत तवय दुष्ट आत्मा आंगमा व्हतात अशी एक दासी जी जवान पोर आमले दखायनी; ती दैवीप्रश्न सांगीन तिना मालकले बराच पैसा कमाडीन देत ऱ्हाये. 17 ती पौलना अनी आमनामांगे ईसन जोरमा बोलनी, "ह्या माणसे परात्पर देवना दास शेतस! ह्या तुमले तारणना मार्ग सांगतस!" 18 अशी ती बराच दिनपावत करत राहीनी, मंग पौल भलताच अस्वस्थ व्हईसन मांगे फिरना अनी त्या दुष्ट आत्माले बोलना, "येशु ख्रिस्तना नावतीन मी तुले आज्ञा करस की, तु हिनामाईन निंघी जाय!" अनी तो आत्मा लगेच निंघी गया.