करिंथ शहरमा पौल
1 त्यानानंतर पौल अथेनैस सोडीसन करिंथ शहरले गया. 2 तवय पंत गावना कोणतरी अक्विला नावना यहूदी त्याले दिसना, कारण सर्व यहूदीसनी रोम शहर सोडीन जावानं अशी क्लौदिया नावना राजानी आदेश करामुये तो नुकताच इटलीतीन त्यानी बायको प्रिस्किल्ला हिनासंगे येल व्हता, त्यासनाकडे तो गया. 3 त्यासना अनी पौलना धंदा एकच व्हता म्हणीसन तो त्यासनाकडे राहीना अनी तठे त्यानी तो धंदा चालाडा; त्याना धंदा तंबु बनाडाना व्हता.