पवित्र आत्मानं येनं
1 मंग पेन्टेकॉस्ट म्हणजे वल्हांडण सण व्हवानंतर पन्नासावा दिन वना, तवय त्या सर्व एक जागावर एकत्र जमेल व्हतात, 2 अचानक आकाशमाईन एक जोरदार वादयनामायक नांद व्हयना अनं ज्या घरमा त्या बसेल व्हतात ते सर्व घर त्या आवाजमा दणकी गयं. 3 अनी त्यासले आग्नीनामायक जिभा येगयेगळा व्हतांना दखाईन्यात, अनं त्यासना प्रत्येकवर एक एक त्या ईसन थांबन्यात. 4 तवय त्या सर्व पवित्र आत्मातीन भरी गयात अनी पवित्र आत्मानी त्यासले जसं बोलानी वाचा दिधी तसतस त्या येगयेगळी भाषामा बोलाले लागनात.
5 यरूशलेममा येगयेगळी भाषा बोलणारा यहूदी लोके राही राहींतात, म्हणजेच त्या धार्मीक लोके ज्या जगना प्रत्येक देशसमाईन येल व्हतात.