35 सर्व गोष्टीसमा मी तुमले कित्ता घालीन दखाडी देयल शे की, तशीच मेहनत करीसन तुम्हीन अशक्त लोकसले मदत करानी, अनी ‘लेवापेक्षा देवामा धन्यता शे, अस जे प्रभु येशु स्वतः बोलना, त्या वचननी आठवण ठेवानी.’"
36 अस बोलानंतर पौलनी गुडघा टेकीन त्या सर्वाससंगे प्रार्थना करी. 37 तवय त्या सर्व भलताच रडनात अनी त्यासनी पौलना गळामा गळा घालीन त्याना मुका लिधात अनी निरोप लिधा. 38 मनं तोंड परत तुमले यानापुढे दिसाव नही, अस जे त्यानी सांगेल व्हतं त्यावरतीन त्यासले विशेष दुःख वाटनं, मंग त्यासनी त्याले जहाजपावत पोहचाडं.