36 अस बोलानंतर पौलनी गुडघा टेकीन त्या सर्वाससंगे प्रार्थना करी. 37 तवय त्या सर्व भलताच रडनात अनी त्यासनी पौलना गळामा गळा घालीन त्याना मुका लिधात अनी निरोप लिधा. 38 मनं तोंड परत तुमले यानापुढे दिसाव नही, अस जे त्यानी सांगेल व्हतं त्यावरतीन त्यासले विशेष दुःख वाटनं, मंग त्यासनी त्याले जहाजपावत पोहचाडं.