लंगडा भिकारी बरा व्हस
1 पेत्र अनं योहान ह्या दुपारना तिन वाजता प्रार्थना कराले वर मंदिरमा जाई ऱ्हाईंतात. 2 तवय तठे जन्मपाईन पांगया असा एक माणुस व्हता; त्याले मंदिरमा जाणारासपाईन भीक मांगाकरता रोज उचलीसन मंदिरना सुंदर नावना दरवाजाजोडे ठेयेत. 3 पेत्र अनं योहान ह्या मंदिरमा जाई राहीनात अस दखीसन त्यानी त्यासनाकडे भीक मांगी. 4 तवय पेत्र अनं योहान त्याले टक लाईन दखं अनी पेत्र बोलना, आमनाकडे दख! 5 तवय त्यासनापाईन काहीतरी भेटी हाई आशा लाईन त्यानी त्यासनाकडे ध्यान दिधं. 6 पण पेत्र त्याले बोलना, मनाजोडे सोनंचांदी काहीच नही, पण जे शे ते तुले देस; नासोरी येशु ख्रिस्तना नावमा चालु लाग! 7 मंग त्यानी त्याना उजवा हात धरीसन त्याले ऊठाडं, तवय त्याना पायसमा अनी गुडघासमा लगेच बळ वनं. 8 तो उडी मारीसन उभा राहीना अनं चालु लागना; अनी चालत, उड्या मारत अनं देवना स्तुती करत त्यासनासंगे मंदिरमा गया. 9 सर्व लोकसनी त्याले चालताना अनी देवना स्तुती करतांना दखं. 10 अनी मंदिरना सुंदर नावना दरवाजाजोडे बठीसन भीक मांगणारा तो हाऊच शे हाई त्यासनी वळखं, तवय त्यानाबद्ल जे घडनं व्हतं त्यानावरतीन त्यासले भलतच आश्चर्य अनी नवल वाटनं.