धर्मसभानासमोर पेत्र अनी योहान
1 पेत्र अनी योहान लोकसनासंगे बोली राहींतात तवय याजक, मंदिरना रक्षक अनं सदुकी ह्या त्यासनावर धाई वनात; 2 कारण त्या लोकसले शिक्षण दिसन, येशु द्वारा मरेलस मातीन परत ऊठनं हाई व्हई अस त्या उघडउघड सांगी ऱ्हाईंतात, यामुये त्यासले राग वना. 3 तवय त्यासनी पेत्र अनी योहानले धरं अनं संध्याकाय व्हयेल व्हती म्हणीन सकायपावत त्यासले कैदखानामा ठेवं.