44 तु जो नमुना दखा तसाच आज्ञासना पाट्यासकरता निवासमंडप बनाड, अस ज्या देवनी मोशेले सांगं, देवनी नेमेलप्रमाणे तो मंडप ओसाड प्रदेशमा आपला पुर्वजसंना व्हता. 45 त्या मंडपले वारस हक्कमा मिळाडीसन आमना पुर्वज यहोशवा संगे त्या येळले आठे लई वनात तवय ज्या लोकसले देवनी त्यासनंसमोरतीन हाकली दिधं, त्यासना देशसवर आपला पुर्वजसंनी कबजा करी लिधा, अनी असच दावीद व्हता तोपावत व्हता. 46 दावीदवर देवनी कृपादृष्टी व्हयनी अनी त्यानी याकोबना देवकरता निवासस्थान बांधानी ईनंती करी. 47 पण ते घर शलमोननी त्यानाकरता बांधी लिधं.
48 पण जो परमप्रधान तो हाततीन बनाडेल घरमा राहस नही; संदेष्टासनी सांगेल शे,
49 7:49 यशया 66:1-2 प्रभु म्हणस, स्वर्ग मनं राजासन शे,
पृथ्वी मनं पादासन शे;
तुम्हीन मनाकरता कोणता प्रकारनं घर बांधश्यात?
मना आरामकरता कोणतं स्थान राहु शकस?
50 मी मना हातघाई हाई सर्व बनाडेल नही शे का?