12 तरी बी फिलीप्प देवनं राज्य अनं येशु ख्रिस्तना नावनी सुवार्ताना संदेश सांगी राहींता तवय लोकसनी ईश्वास ठेवा अनी बाया अनं माणसंसना बाप्तिस्मा व्हयना. 13 शिमोननी बी स्वतः ईश्वास ठेवा; अनं बाप्तिस्मा लिसन तो फिलीप्पना सहवासमा राहीना अनी ज्या मोठा आश्चर्यकर्म अनं चमत्कार घडनात त्या दखीसन तो थक्क व्हयना.